<
वरणगाव – प्रतिनिधी
२२ आईस्क्रिम, लस्सी, पाणीपुरी, भेळ विक्रेत्यांच्या परिवाराला पाठविले यु.पी.च्या बॉर्डरपर्यंत
वरणगाव – यु.पी.मधील वरणगाव येथील 22 आईस्क्रिम, लस्सी, पाणीपुरी, भेळ विक्रेते यांच्या परिवाराला आज मंगळवार रोजी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी यांनी या विक्रेत्यांना त्यांच्या यु.पी.मधील मूळ गावी पाठविण्याची वेवस्था करून दिली.
याबाबत सविस्तर असे की, वर्षानुवर्षे वरणगाव येथील आईस्क्रिम, लस्सी, पाणीपुरी, भेळ परप्रांतीय विक्रेते हे लॉकडाऊनमुळे हे विक्रेते येथेच थांबून होते. 2 महिन्यापासून येथे परिवारासहित असलेले या विक्रेत्यांना त्यांच्या घराची आस लागली होती. त्यांनी याबाबत राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष संतोष माळी, यश मराठे, प्रवीण चौधरी, भरत भोई यांनी आज दुपारी 4 वाजता या 22 विक्रेते यांना कृझरद्वारे भुसावळ येथे पाठविण्याची वेवस्था केली. तेथून बसद्वारे बऱ्हाणपूर आणि तेथून राजेंद्र चौधरी यांचे मावस भाऊ दिनेश चौधरी यांनी त्यांची मुक्कामाची व जेवणाची संपुर्ण व्यवस्था थेट यु. पी. मधील झासी येथील त्यांच्या गावी बसद्वारे पाठविन्याची व्यवस्था केली आहे.