<
जळगाव, (जिमाका) दि. 13 – कोव्हीड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता, जळगाव जिल्हयातील कोविड केअर सेंटर, (Covid Care Centres) कोविड हेल्थ सेंटर, (Covid Health centres) डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (Dedicated Covid Hospitals) मधील सोयीसुविधांच्या अनुषंगाने नियंत्रण व समन्वय ठेवण्याकरीता तसेच रुग्णांना यथोचित आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी शहरी व ग्रामीण भागाकरीता सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
सतीष कुलकर्णी, आयुक्त, जळगाव महानगर पालिका यांना महानगरपालिका कार्यक्षेत्राकरीता आरोग्य सुविधांचे त्रिस्तरीय वर्गीकरण करणे व सर्व संबंधीत यंत्रणा, घटक यांचेशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्याकरीता Incident Commander म्हणून घोषीत केले आहे. तर गोरक्ष गाडीलकर, अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समीती यांना जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्र वगळून उर्वरित जळगाव जिल्हा (नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रासह) कार्यक्षेत्राकरीता जिल्हा आरोग्य सुविधांचे त्रिस्तरीय वर्गीकरण करणे व सर्व संबंधीत यंत्रणा, घटक यांचेशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्याकरीता “Incident Commander” म्हणून घोषीत केले आहे.
Incident Commander यांनी “Covid Care Centres” करीता एका अधिका-याची स्वतंत्र नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिका-यांनी वेळोवेळी “Incident Commanders” याचेशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी.
“Incident Commander” यांनी Containment Zone म्हणून घोषीत करण्यात आलेल्या क्षेत्राकरीता एका अधिका-याची स्वतंत्र नोडलअधिकारी म्हणून नियुक्ती करावी. नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिका-यांनी वेळोवेळी “Incident Commanders” यांचेशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी. “ Incident Commanders” यांनी त्रिस्तरीय रचनेकरीता आवश्यक ते मनुष्यबळ, खाजगी रुग्णालये, साधनसामग्री व उपकरणे, रुग्णवाहीका, शासकीय व खाजगी वाहने, शववाहिका आवश्यकतेप्रमाणे अधिग्रहित करावेत. तसेच Covid-१९ च्या अनुषंगाने वेळोवेळी आवश्यक असणारे सर्व आदेश/निर्देश/सुचनाचे स्तरावरुन संबंधितांना निर्गमित करण्यात यावेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार “ Incident Commanders” यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये, कोणत्याही शासकीय/निमशासकीय/ खाजगी आस्थापना/ यंत्रणा, अत्यावश्यक सेवांशी संबंधीतांवर नमूद कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे अधिकार संबंधीत “Incident Commanders” यांना राहतील. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.