<
चाळीसगांव(प्रतिनीधी)- तृतीयपंथी समाजासाठी एक वंचित घटक, समाजाकडून नेहमीच दुर्लक्षित राहिला घटक. या घटकाची आयुष्य जगण्याची तऱ्हा अगदी जगावेगळीच असते. त्यांच्या उपजिविकेची साधने सुध्दा अलगच. त्यांचं उत्पन्न कमविण्याचे मार्ग देखील वेगळेच. सद्य परिस्थितीत संपूर्ण जगात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. यामुळे या तृतीय पंथीचे उत्पन्न कमविण्याचे मार्ग बंद झालेले आहेत. दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी हतबलता आलेली आहे.
या कष्टमय हतबलतेतून बाहेर पडण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. अनेक प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही त्यांना वाट सापडत नव्हती. अखेर त्यांना एक आशेचा किरण दिसला ते म्हणजे कृती फाऊंडेशन. कृती फाउंडेशनच्या TAG LINE “A RAY OF HOPE” प्रमाणे कृती फाऊंडेशन चाळीसगावचे ज्येष्ठ सल्लागार शांताराम माळी यांचे संकल्पनेतून या तृतीयपंथीयांसाठी मदत करण्याची संकल्पनेस मूर्त स्वरूप देण्याचे निर्णय घेतला. कृती फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुजीत माळी आणि सहसचिव जयश्री माळी यांचे पुढाकाराने जुना मालेगाव रोड, भडगाव रोड, टाकळी प्र. चा.येथील तृतीयपंथीयांसाठी जीवनावश्यक वस्तू आणि किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण येवले, मनीष माळी, संगिता माळी, हेमंत पाटील, स्पंदन माळी, तुषार महाजन, मनोज करनकाळ, सार्थक माळी, धनंजय मोरे, गणेश पवार यांचे अनमोल सहकार्य लाभले. कृती फाउंडेशनच्या या अभिनव उपक्रम बाबत तृतीयपंथीयांचे गुरू कविता आक्का, ममता, शुभांगी, शिवानी, कशिश, करिश्मा, शाहीन, झारा, निक्की, तरन्नुम यांनी आभार व्यक्त केले.