<
जिल्ह्यात आतापर्यंत 210 कोरोना बाधित रूग्ण आढळले
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 13 – जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, अडावद, चोपडा येथील स्वॅब घेतलेल्या 24 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आता नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 23 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून एक व्यक्तींचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
पॉझिटिव्ह आढळलेली व्यक्ती भज्जेगल्ली, भुसावळ येथील 34 वर्षीय पुरूष आहे.
आज भुसावळ येथील दोन कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून यात 50 वर्षीय महिला व 63 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 210 इतकी झाली असून त्यापैकी एकोणतीस व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर जिल्ह्यात आतापर्यंत सत्तावीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
Jalgav madhe Corona che lakshan vadhlya mule prashashan ne kadak dndhobast kele pahije
Corona virus jalgav madhe khup vadhalya mule jalgavat sanchar bandi kele pahije prashashan ne laksha dile pahije