<
दिनांक : १४ मे २०२०, मुंबई प्रतिनिधी
लॉकदौंमुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजनंतर आता मुंबईसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेजची मागणी केंद्र सरकारकडे होऊ लागली आहे.
शिवसेनेनंतर आता राष्टवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही अशीच मागणी केली आहे.
आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ‘भारताच्या जडणघडणीत मुंबईचा मोठा वाट आहे. कालपर्यंत देशांत कररूपाने सर्वात जास्त पैसे हा मुंबईतुन जमा होत होता. आता मुंबईला नव्याने उभारी देण्याची गरज आहे. मुंबईतील उद्योग , आरारोग्य, कामगार क्षेत्रासाठी एका स्वतंत्र आणि मोठ्या पॅकेजची आवश्यकता आहे’, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ आहे.’ अशी आठवणही त्यांनी केंद्र सरकारला करून दिली.