Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोव्हिड-19 च्या अनुषंगाने सर्व्हे करण्यासाठी जिल्ह्यात 18 मे पासून पथक येणार आर. आर. तडवी यांची पथकाचे संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read


जळगाव, दि. 14 (जिमाका) – आरोग्य सेवा संचालनालय, पुणे यांचेकडील 13 मे, 2020 रोजीच्या पत्रानुसार जिल्ह्याचा कोविड-19 च्या अनुषंगाने नॅशनल सेरो सर्व्हे (National Sero Servey) केला जाणार आहे. याकरीता पथक दिनांक 18 ते 22 मे, 2020 दरम्यान जिल्हा दौऱ्यावर येत आहे.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी येणाऱ्या केंद्रीय पाहणी पथकासोबत येणारे अधिकारी, कर्मचारी हे जिल्ह्यात आल्यानंतर आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणेकामी व संबंधित सर्व्हे पथकाला सहकार्य करून समन्वय ठेवण्याकामी संपर्क अधिकारी म्हणसून जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आर. आर. तडवी यांची नियुक्ती केली असून तसे आदेश निर्गमित केले आहे.
श्री. तडवी हे सर्व्हे करणारे पथक जिल्ह्यात आल्यापासून सर्व्हेचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संबंधितांच्या संपर्कात राहून त्यांना वेळोवेळी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधांबाबत समन्वय ठेवावेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास अथवा भंग केला गेल्यास सर्व संबंधित आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, 1897 व भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहतील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ- जितेंद्र आव्हाड

Next Post

जळगाव जिल्ह्यातील 35 रुग्णांची कोरोनावर मात, बरे होऊन गेले घरी

Next Post
एपीएमसी मार्केटमधील कोव्हीड 19 विशेष तपासणी शिबिराचा 4 हजारहून अधिक व्यापारी, कामगारांनी घेतला लाभ

जळगाव जिल्ह्यातील 35 रुग्णांची कोरोनावर मात, बरे होऊन गेले घरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo