<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
कोरोनाच्या वाढत्या प्रभावात त्याला रोखण्यासाठी लढणाऱ्या योद्ध्यांनादेखील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे व यात पोलिसांची संख्या देखील वाढत चालली आहे. अशीच एक दुःखद घटना मुंबईतील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात घडली असून येथील पोलीस शिपायाला कोरोनांची लागण झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील ४५ वर्षीय पोलीस शिपाई, तब्येत अचानक बिघडल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने उपचारकरिता त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शासकीय रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे आढळून आल्याने त्यांना नवीमुंबई येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान त्यांचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. त्याच्या पत्नी ही कोरोना बाधित असल्याने त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले आहे. हे पोलिस शिपाई १९९४-९५ बॅचचे होते.