<
जळगाव – येथील केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रथमोपचार कसा व केंव्हा करावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.आपल्या शाळेच्या आवारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी खाली पडणे ,भाजणे ,बुडणे , साप चावणे, जीव घाबरणे , रस्त्यावर झालेला अपघात अशा विविध प्रकारच्या घटनेतून शारीरिक इजा होऊन मोठे नुकसान होण्यापूर्वी आपण अशा पीडित व्यक्तींना दवाखान्याची सुविधा उपलबध होण्यापूर्वी कोणत्या प्रकारचा घरगुती इलाज केला पाहिजे याविषयी उपशिक्षक योगेश भालेराव यांनी एका सुंदर उपक्रमाद्वारे मार्गदर्शन केले.
या उपक्रमात इयत्ता 2री च्या विद्यार्थ्यांकडून स्वतः च्या घरासाठी एक छोटीशी प्रथमोपचार पेटी तयार करण्यात आली.त्यात त्यांनी कापूस , डेटॉल जखमेचा मलम , हायड्रोजन ,कात्री ,बँडेज पट्टी ,विविध प्रकारच्या गोळ्या ठेवल्या व त्याविषयी व त्यांच्या वापराविषयी अचूक अशी माहिती सांगितली व त्याचा वापर आम्ही कसा करू हे प्रत्यक्षिकांद्वारे पटवून दिले.
केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रथमोपचारासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. प्रथमोपचार म्हणजे एखाद्या आजारात किंवा जखम झाल्यास केलेले प्राथमिक उपचार. प्रथमोपचार हे सामान्यत: एखाद्या तज्ज्ञ नसलेल्या व्यक्तीद्वारे एखाद्या आजारी किंवा जखमी व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीत विशिष्ट वैद्यकीय उपचार उपलब्ध होईपर्यंतच्या काळात दिले जातात. सामान्यत.या इजा म्हणजे खाली पडणे, भाजणे, बुडणे व रस्त्यावरील अपघात.इत्यादी ,त्या जाणून त्यावर योग्य वेळी प्रथमोपचार होणे .
उपक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी मुख्या.रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले त्यास सर्व विद्यार्थी व पालक यांनी भरभरून प्रतिसाद दिला.