<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
मुलुंड मधील कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हाॅटस्पाट ठरलेल्या इंदिरा नगर, रामगड, विठ्ठल नगर, अमर नगर या विभागांसह साल्पादेवी पाडा, केशवपाडा, श्रीराम नगर, गणेश काॅलनी, सन्मित्र को-ऑप सोसा., साल्पादेवी सदन इत्यादी भागात आज साहेब प्रतिष्ठानच्या वतीने निर्ज॔तुकीकरण करण्यात आले असून यापुढे दररोज सकाळी ११ ते सायं. ४ वाजेपर्यंत या सर्व विभागातील सार्वजनिक शौचालयांचे निर्ज॔तुकीकरण करण्याचा साहेब प्रतिष्ठानने संकल्प केला असून कोरोनाला मुलुंड मधून हद्दपार करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार यापुढे मुलुंडमधील हाॅटस्पाट ठरलेल्या विभागातील सर्वच सार्वजनिक शौचालयांचे दररोज निर्जन्तुकीकरण करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष संजय मशिलकर यांनी सांगितले.
या उपक्रमात आनंद जाधव, जगदीश शेट्टी, नितीन सावंत, चंद्रकांत शेलार, बाबा भगत, प्रमोद कांबळे, शिवाजी खराडे, मनोज जाधव, अनंत सावंत, शैलेंद्र नाचणकर, संजय माळी आणि इतर अनेक सहकारी सहभागी झाले होते.