<
कळंब, प्रतिनिधी (हर्षवर्धन मडके)
व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय औरंगाबादचे सहसंचालक एस आर सूर्यवंशी आणि निरीक्षक के. एस. उबाळे यांच्या आदेशानुसार औरंगाबाद विभागात जोडारी व्यवसायाचे जिल्ह्यानुसार गट तयार करून ऑनलाइन प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवला जात आहे. राज्यातील औदयोगिक प्रशिक्षण संस्था दि १६ मार्चपासून बंद आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्व शैक्षणिक संस्था लॉकडाऊन १.०, लॉकडाऊन २.०, लॉकडाऊन ३.० मध्येही बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. आयटीआयचे शैक्षणिक वर्ष आगस्ट ते जुलै असते. त्यानुसार १४ मार्चपर्यंत ६०% अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला होता. राहिलेला ४०% अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन झुम व्हीसी, गुगल टीम, व्हाट्सअप्प, यु ट्यूब, गुगल फॉर्म इत्यादी माध्यमातून सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार सर्व निदेशकांनी संस्थास्तरीय व्यवसायनिहाय गट तयार करून अभ्यासक्रम पूर्ण करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर सहसंचालक आणि निरीक्षक यांच्या आदेशानुसार जिल्हानुसार व्यवसायनिहाय गट तयार करून यापद्धतीत ऑनलाइन प्रशिक्षण राबविण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्याचा जोडारी व्यवसायाचा गट तयार करून त्यावर नियंत्रक म्हणून कळंब आयटीआयचे प्राचार्य एस व्ही सूर्यवंशी आणि उस्मानाबाद आयटीआयचे गटनिदेशक मुकुंद महाडिक यांची नियुक्ती विभागस्तरातून करण्यात आली. तदनंतर जोडारी वरिष्ठ व्यवसायासाठी समन्वयक शिल्पनिदेशक मनोज चौधरी आणि कनिष्ठ व्यवसायासाठी समन्वयक शिल्पनिदेशक बालाजी वाघमारे यांना नेमून जिल्ह्यातील सर्व जोडारी व्यवसायांचे निदेशक एकत्र करून ऑनलाइन अभ्यासक्रम जिल्ह्यास्तरावर एकाच वेळी घेण्याबाबत सूचित करण्यात आले. त्यानुसार दि १५ एप्रिल पासून १५ मे पर्यंतचा पाठ्यक्रम विभाजित करून ऑनलाइन व्हीसी, गुगलफॉर्मद्वारे टेस्ट, यु ट्यूबद्वारे मार्गदर्शक व्हिडीओ, व्हाट्सअपद्वारे अडचणी सोडून घेणे इत्यादी ऍक्टिव्हिटी घेण्याबाबत वेळापत्रक ठरविण्यात आले. जोडारी वरिष्ठ व्यवसायाचे शिल्पनिदेशक मनोज चौधरी, समाधान धांगट, नीलकंठ वाघमारे तसेच कनिष्ट व्यवसायाचे शिल्पनिदेशक रामेश्वर तोडेकर, अरुण कोळी, सौरभ पाटील, धैर्यशील मडके, वासुदेव मुंढे यांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन माध्यमातून अभ्यासक्रम पूर्णत्वास नेत आहेत. वरीलप्रमाणे केलेल्या १५ मेपर्यंतचा पाठ्यक्रम पूर्ण झालेला असून आता पुढे १५ जूनपर्यंतचा पाठ्यक्रम तयार केला असून त्यानुसार सर्वांची तयारी चालू आहे.
डारी व्यवसायाचे विभागानुसार खालील जिल्हासमनव्यक शिल्पनिदेशक प्रशिक्षण कार्यक्रम घेत आहेत.
उस्मानाबाद:- मनोज चौधरी, बालाजी वाघमारेलातूर:- एस बी निलेवाड, एस एस पेंढारकरहिंगोली:- जी व्ही कुलकर्णीपरभणी:- के डी उमरीकर, काचकुंडेजालना:- आर जी गायकवाड, एस के राठोडऔरंगाबाद:- आर व्ही आचार्य, मांडे, आर पी चौधरीनांदेड:- ए बी हसनपल्ली, एम व्ही उदबुकेबीड:- इंगोले, जोगदंड.
दररोज सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० पर्यंत ईक्लास
जिल्ह्यात दररोज सकाळी २ तास ईक्लासचे आयोजन केले जात असून त्याद्वारे आपण वर्गातच शिकत असल्याची अनुभूती प्रशिक्षणार्थ्यास मिळत आहे. व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे शिकत असताना वेगवेगळ्या पीपीटी, व्हिडीओ, स्क्रीन शेअरिंग, आकृत्या, व्हाइट बोर्डवर आकेडमोड पहावयास मिळत असल्याने प्रशिक्षणर्थ्यांना सहजरित्या समजत आहे.
ईक्लासनंतर ऑनलाइन गुगल टेस्ट
ईक्लासमध्ये थेअरी शिकल्यानंतर मूल्यांकन करण्यासाठी शिकवलेल्या घटकावर गुगल फॉर्मद्वारे ई टेस्ट तयार केली जाते. या टेस्टची लिंक मुलांच्या ग्रुपवर टाकल्यानंतर ते प्रश्न सोडवून ऑनलाइनच सबमिट करतात. सबमिट केल्याबरोबरच त्यांना किती गुण मिळाले हे पाहायला मिळते आणि निदेशकांकडे रेकोर्ड तयार राहते.
जबाबदारी एकमेकांवर असल्याने प्रशिक्षण पूर्णत्वास
व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचनालयन मुख्य कार्यालय मुंबई यांचे नियंत्रण प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद यांचे नियंत्रण जिल्हा नियंत्रक यांचे नियंत्रण समन्वयक यांचे नियंत्रण निदेशक आणि निदेशकांचे नियंत्रण प्रशिक्षणार्थ्यावर असल्याने प्रशिक्षणात पारदर्शकता आलेली आहे.