<
कळंब, प्रतिनिधी(हर्षवर्धन मडके)
कोरोना विषाणू पासून नागरिकांनी काळजी घेण्यासाठी जिल्हाधकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्षा दिपा मुधोळ- मुंढे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येकाने बाहेर जाताना किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, लिक्विड सूप ने हात धुणे इत्यादींबाबत आपण सगळेच जागृत आहोत. त्याबरोबर प्रत्येक व्यक्तीची प्रतिकार शक्ती वाढणे तितकीच आवश्यक आहे. रोजच्या जेवणामध्ये सकस अन्न आपण ग्रहण करतो. स्वच्छ भाजी, कडधान्य, फळ इत्यादी वापरही करतो. परंतु आता ऋतु बदल होत आहे. उन्हाळ्यामध्ये आपण सर्वांनी आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसेच आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आयुर्वेदातील साध्या साध्या उपायापासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. तसेच आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आपल्या आहारात पुढील गोष्टींचा समावेश केला तर निश्चितच आपण आपली प्रतिकार शक्ती वाढवू शकतो.
उन्हाळा (ग्रीष्म)ऋतु घ्यावयाची काळजी
१ सामान्य उपाय :-
ब्रश केल्यावर चिमूटभर मीठ घेवून दात व हिरड्याना लावावे ज्याने जमलेल्या घशातून कफ निघून जाईल.
सकाळी उठल्यावर अर्धा ग्लास गरम पाणी प्यावे.
रोज सकाळी ३० मिनिटे व्यायाम करावा(योगासन,प्राणायाम,ध्यान(meditation)करावे.)
सकाळी आठच्या पूर्वी चहा सारखा काढा करून प्यावा.(सुंठ,मिरे, पिंपळी (त्रिकटू),तुळशी,दालचिनी यांचा अर्धा कप काढा)
२. जिवनिय शक्ती वाढवणे/रोग प्रतिकार शक्ती वाढवणे)सुवर्ण प्रश्न:-
सारस्वतारिष्ट सुवर्णयुक्त – लहान मुलांना (६ ते १२ वर्ष पर्यंतच्या चार चमचे पाण्यामध्ये एक चमचे घालून घ्यावा)
सारस्वतारिष्ट सुवर्णयुक्त – (नागार्जुन फार्मसी केरळ)शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, उस्मानाबाद बालरोग विभागात सुवर्ण प्राशन उपलब्ध आहे.
शतावरी,ज्येष्ठ मध,अश्वगंधा,गुळवेल, आमलकी (आवळा)समभाग पावडर करून दोन वेळा २-२ ग्रॅम खावे .
एक एक थेंब तीळ तेल नाकात घालावे. (नस्य)/तूप/नारळाचे तेल सकाळी व संध्याकाळी.
घासा खवखवत असल्यास मीठ व चिमुटभर टंकन (बोरॅक्स) पावडर गुळण्या करणे व कंठसुधारक वटी तोंडात ठेवून चघळावी.
३.आयुर्वेदिक प्रक्रिया :-
नाकमध्ये एक एक थेंब तीळ तेल,खोबऱ्याचे तेल.तूप सकाळ संध्याकाळ घालावे.
एक चमचा तीळ तेल/एक चमचा खोबरेल तेल २-३ तोंडात घेवून गुळण्या करून थुंकावे.नंतर गरम पाण्याने तोंड धुवावे.
४.सामान्य उपाययोजना
कमी तेलाचा आहार घ्यावा.
हळद घातलेले दूध
काढा करून पिने(तुळस/मिरी/अद्रक/मनुका/दालचिनी)
काळा चहा, अद्रक व काळे मीठ घालून घ्यावा.
कोल्ड्रिंक्स , आईसक्रीम,बर्फ यांचे सेवन टाळावे.
अर्धा तास सक्तीची विश्रांती घ्यावी.
पावसाळा(वर्षा ऋतु)घ्यावयाची काळजी
अद्रकाचा वापर वाढवावा.
चहा,कॉफी मध्ये अद्रक वापरावे.
काळा चहा अद्रकाचा ,काळे मीठ(पा) घालून घ्यावा.
दिवसा झोपू नये.
वरील प्रमाणे आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व नागरिकांनी अंमलबजावणी केल्यास आरोग्य चांगले राहून प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होईल.असे जिल्हाधकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्षा दिपा मुधोळ- मुंढे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे अशी माहिती दिली.