<
जामनेर(प्रतिनिधी)- ओमटेक्स स्पोर्ट्स आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संपूर्ण भारत देशातून ४ खेळाडूंना झूम अॅप द्वारे जोडण्यात आले असता त्यात भारतीय क्रिकेट संघातील माजी फिरकीपटू साईराज बहूतुले, रणजी क्रिकेट मध्ये सर्वात जास्त धावा पटकावणारे वसीम जाफर, तसेच उत्कृष्ट फलंदाज मनोज तिवारी यांच्या सोबत जामनेर येथील क्रिकेटपटू साईराज शिंदे याला संधी प्राप्त झाली.
लॉकडाऊन मुळे सर्वच खेळाडू घरात बसून आहेत.सराव बंद आहे, जिम बंद आहे अश्या परिस्थितीमध्ये खेळाडूंनी आपल्या खेळावर व शरीरावर कसं नियंत्रण ठेवायचं त्याच प्रमाणे येत्या काळात क्रिकेट कडे पुढे घेऊन जावे या बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. भारतीय क्रिकेट संघातील व चेन्नई सुपर किंग संघातील खेळाडू केदार जाधव व साईराज शिंदे हे दोघेही पुणे येथील पी वाय सी हिंदू जिमखाना येथे येणाऱ्या सिझन साठी प्रशिक्षण घेत आहेत परंतु कोरोणा मुळे सर्व क्लब बंद असल्याने सर्व खेळाडूंना घरात बसूनच क्रिकेट बद्दल विचार करावा लागत आहे. तर हा वेळ वाया न घालवता स्वतः बद्दल विचार करून आपण कुठे कमी पडत आहोत हे आत्मनमन करून येणाऱ्या काळात चांगलं प्रदर्शन कसे करता येईल यावर खेळाडूंनी भर द्यावा असे आवाहन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केले आहे.