<
जळगाव – रमझान हा पवित्र महिना सुरु आहे. या काळात केलेले दान हे पवित्र मानले जाते. मुस्लीम धर्मात जकात ला अत्यंत महत्व दिले गेलेले आहे, या जकात अंतर्गत जळगाव येथील व्यापारी हमीद मेमन व जावेद मेमन यांनी इंडिअन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा, जळगावला कम्युनिटी किचन साठी एक लाखाचा धनादेश दिला. ही मदत गोर गरीब लोकापर्यंत कम्युनिटी किचनच्या माध्यमातून पोहोचवली जाणार आहे.
जे भुकेले आहेत त्याना पोटभर जेवण देणे, जे तहानलेले आहेत त्यांना पाणी व चहा देणे, जे गरजू आहेत त्यांना जेवणाचे साहित्य देणे, जे गोर गरीब आहेत त्यांना कपडे देणे असे पवित्र कार्य जकात या माध्यमातून अनेक दानी दातृत्व भाव ठेऊन देत असतात.
जळगाव जिल्ह्यात व शहरातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या स्वरूपात डोक वर काढत आहेत. अनेक निर्वासित मजूर, गोर गरीब जनता, लहान मुले भीतीच्या सावटाखाली आहे. त्यांना पोटभर जेवण मिळावे, चहा, नाश्ता मिळावा या संकल्पनेचा आधार घेउन कुराण या धर्म ग्रंथातील जकात या पवित्र मानल्या गेलेल्या रमझान महिन्यात दान करावे जेणे करून रमझान महिन्याचे पावित्र्य राखण्याचे पुण्य फळ मिळते.
जळगाव येथील व्यापारी गुजरात पेंटचे मालक हमीद मेमन व जावेद मेमन यांनी इंडिअन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा, जळगावला कम्युनिटी किचन साठी रकम रुपये एक लाखाचा धनादेश दिला. ही मदत गोर गरीब लोकापर्यंत कम्युनिटी किचनच्या माध्यमातून पोहोचवली जाणार आहे.
कोविड – १९ अंतर्गत कम्युनिटी किचन च्या माध्यमातून इंडिअन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा, जळगाव शाखेतर्फे – ११ एप्रिल, २०२० पासून दररोज सकाळ संध्याकाळ ४००० जेवणाचे पाकीट गोर गरीब मजूर आणि बाहेरील प्रांतातील आश्रितांना देण्यात येत आहेत तसेच ज्यांना क्वारंटाईन मध्ये असलेल्या कोरोना संशयित शेकडो लोकांना सकाळचा चहा बिस्कीट, नाश्ता, दुपारचे व संध्याकाळचे जेवण दिले जात आहे.
रेडक्राँस आणि ओसवाल सुख शांती संघ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कम्युनिटी किचन उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हयातील शहरातील दानशूर दात्यांनी कम्युनिटी किचनला योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन रेडक्रॉसचे उपाध्यक्ष – गनी मेमन, मानद सचिव– विनोद बियाणी, चेअरमन रक्तपेढी – डॉ. प्रसन्नाकुमार रेदासनी, आपत्ती व्यवस्थापनाचे चेअरमन– सुभाष सांखला, सह-कोषाध्यक्ष– अनिल कांकरिया व सह सचिव राजेश यावलकर, रेडक्रॉस जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र यांचे नोडल ऑफिसर – श्री, घन:श्याम महाजन, जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा यांनी केले आहे. रेडक्रॉस कार्यकारिणीच्या पदाधिकारिंच्या सहयोगाने हे किचन अव्याहतपणे सुरु आहे . रेडक्रॉसने रेडक्रॉस स्वयंसेवकांची रचना केली आहे त्यातील जवळपास पन्नास स्वयंसेवक या उपक्रमात कार्यरत आहेत.