<
जळगाव, दि. 15 (जिमाका) – महाराष्ट्र राज्यात कोव्हिड -19 या संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कोरोनाग्रस्त बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा असामान्य परिस्थीतीत युवकांनी बहुसंख्येने सहकार्य केल्यास या परिस्थितीशी प्रतिकार करण्याकरीता युवकांचे मोठे योगदान, पाठबळ मिळेल. हा दृष्टीकोन समोर ठेवून युथ वारीयर व्हॉलेंटीयर यांची नावनोंदणी करण्याकरीता युवक मंडळे, युवा संस्था, खेळाडू, एन. सी.सी., एन. एस. एस. च्या ईच्छूक युवकांनी स्वेच्छेने
https://forms.gle/Kx888UFUREsxisSi9
या गुगल लींकवर विचारलेली संपूर्ण माहिती भरावी व आपल्या नावाची नोंदणी करावी. या युवकांना केंद्रीय युवा मंत्रालयामार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील अनेक युवक मागील दोन महिन्याच्या कालावधीत कोवीड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीवर मात करण्याकरीता सामाजिक भान ठेवून मदतीकरीता पुढे आलेले आहेत. त्यांनीही यामध्ये नावनोंदणी करुन जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मिलिंद दिक्षित यांनी केले आहे.