<
जळगांव(प्रतिनीधी )- येथील वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद (VBVP) चे जिल्हाअध्यक्ष रुपेश महाजन यांच्या मार्फत पुन्हा एकदा विद्यार्थी हिताची मागणी जिल्हाधिकारी व गृहविभाग,जळगांव यांच्याकडे ईमेल द्वारा करण्यात आली. जळगांव हे विद्यापीठाचे स्थान असून बहुतांश खेडेगावातील आणि लहान शहरातील शेतकरी आणि कष्टकरी परिवारातील विद्यार्थी शिक्षणासाठी इथे रूम करून राहत आहेत. सुरुवातीला ३१ मार्च पर्यंत लॉकडाऊन असल्याने सर्व विद्यार्थी काही दिवस घरी थांबून लगेच येऊ या उद्देशाने त्यांचा सामान, त्यांचे उपयुक्त अश्या वस्तू रूम वरच ठेऊन घरी निघाले. परंतु कोरोनाचा प्रभाव वाढला असता, शासनाने हा लॉकडाऊन चा निर्णय अजून वाढवून तो आज ३१ मे पर्यंत करण्यात आला आहे. घर मालक यांच्या नियमानुसार विद्यार्थ्यांची कोणतेही वस्तू रूम मध्ये असल्यास तो त्या रूमचा भाडेकरू असून त्या तारीख प्रमाणे भाडे द्यावे लागते. परंतु लॉकडाऊन वाढेल अशी कल्पना विद्यार्थी वर्गाला नसल्या कारणाने विद्यार्थ्यांनी त्यांचा सामान, वस्तू रूम वरच राहू दिल्या असून त्यांना लोकडाऊन मुळे त्यांना तो सामान त्यांच्या राहत्या घरी नेता आले नाही. जवळपास दोन महिने उलटले आहे. रूम मालकांच्या नियमानुसार त्यांना विद्यार्थ्यांना भाडे देने लागते. परंतु विद्यार्थी वर्ग रूम वर राहत नसल्यामुळे घर मालकाचे कोणतेही वापर झालेला नाही आणि त्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नसून त्यांचा विद्यार्थ्यांना घर भाडे मागायचा कोणताही अधिकार नाही. याआधी सुद्धा शिवश्री.इंजि.चेतन तांगडे यांनी या बद्दलचे निवेदन दिले असता त्याची प्रशासनाने दखल घेतलेली नाही. या सर्व परिस्थितीचा विचार करून आम्ही सर्व विद्यार्थी निवेदन करतो की लॉकडाऊन काळातील घर भाडे माफ करून विद्यार्थ्यांना मदत करण्याची मागणी ई-मेल द्वारा जळगांव जिल्हाधिकारी यांना शिवश्री रुपेश महाजन यांनी केली आहे. यामध्ये वि.भ.वि.प चेतन तांगडे, भूषण सूर्यवंशी, मासु चे जिल्हाअध्यक्ष रोहन महाजन, विकास मोरे, मनोज बाविस्कर यांचे सहकार्य लाभले.