<
जळगांव(प्रतिनीधी)- सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळकरी विद्यार्थांना सुरक्षेच्या दृष्टिने २२ मार्च पासून सुट्या देण्यात आल्या आहे. यात मुलांकडून आँनलाईन अभ्यास करुन घेतला जातोय. अशातच मुलांमध्ये कोरोना विषाणूची भिती कमी व्हावी व त्यांच्यावरचा तणाव कमी व्हावा तसेच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून ५ ते १४ या वयोगटातील मुलांसाठी कृती फाऊंडेशनच्या वतीने ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
यात १)कोरोना योद्धा २) सद्य परिस्थितीतील प्रेरणा गोष्टी /घटक ३)कोरोनामुळे पर्यावरणातील बदल या विषयांवर रेखाटलेली चित्राकृती मागविण्यात आल्या होत्या. आज रोजी तीन उत्कृष्ट कलाकृतींची निवड करून त्यांना आँनलाईन पध्दतीने प्रमाणपत्रे व पारितोषिके पाठविण्यात आली. जगभरातील भारताशिवाय फिजी डेन्मार्क सिंगापुर घाना व इतर १७ देशातील सुमारे ११५४ बालकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.आर्या साकोरे,(महाराष्ट्र)(इंडिया), दुसरा क्रमांक कु.सौनुवा दत्ता(प.बंगाल)(भारत), पिटर क्लीटस(युक्रेन) व तिसरा क्रमांक कु.राधिका अरगडे,नवी मुंबई(भारत), हेंरी पुलित्सर (रशीया) यांनी मिळविला तर उत्तेजनार्थंना १० पारितोषीके देण्यात आली.कृतीच्या आँस्ट्रेलियातील महीला व बाल आघाडी प्रमुख स्वप्ना महाजन, प्रशांत बेर्डे, आनंद शेवाळे, शेखर महाजन, चैतन्य पेशवे, विशाल गोकुळे यांनी या स्पर्धेचे व्यवस्थापन केले. त्यांना नितीन चौधरी, रुपेश दारवटकर, जान्हवी महाजन, अतुल जमदाडे, अनिल कांदळकर, सिध्दी महाजन व रवि चुत्तर यांनी सहकार्य केले. सर्व विजेत्यांचे फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत महाजन, कार्याध्यक्ष अमित माळी, डॉ श्रद्धा माळी यांनी अभिनंदन केले.