<
कळंब, प्रतिनिधि | हर्षवर्धन मडके
जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत आज 38 व्यक्तींच्या स्वाब चे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 30 व्यक्तींच्या स्वाबचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले असून उर्वरित 8 व्यक्तीच्या स्वाबचे रिपोर्ट प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.