<
जळगाव,(प्रतिनिधी)- मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे नायगाव येथील श्रीमती उषाबाई रवींद्र पोहेकर यांचे स्वस्त धान्य दुकाना विरुद्ध गावकर्यांनी पुराव्यानिशी तक्रारी केल्यानंतर पुरवठा विभागाच्या तपासणी दोषी आढळल्याने सदर दुकानाचे प्राधिकार पत्र पुढील तीन महिन्यासाठी निलंबित करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी आज काढले.
सदर स्वस्त धान्य दुकानदार हे लाभार्थ्यांना कमी प्रमाणात धान्य वाटप करतात, लाभार्थी महिलांशी उद्धट पणे वागतात, दुकानात कोणत्याही प्रकारचे फलक लावलेले नाही,लाभार्थ्यांना जास्त भावाने धान्य वितरण करतात यासह आदी दोषारोप चौकशीअंती आढळून आले आहे.याबाबत मात्र स्वस्त धान्य दुकानदार यांनी तहसीलदार यांच्याकडे मांडलेल्या लेखी खुलाशात दोषारोप नाकारले आहे. तहसीलदार मुक्ताईनगर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडे सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने दोषारोप व दुकानदार यांच्या खुलाशावरून स्वस्त धान्य दुकानदार यांनी धान्य वितरणात केलेला गैरप्रकार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गंभीर असल्याचा ठपका ठेवत जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सदर दुकानाचे प्राधीकारपत्र तीन महिन्यासाठी निलंबित केल्याचे आदेश काढले आहे.