<
जळगाव,(प्रतिनिधी)- चाळीसगाव शहरातील स्वस्त धान्य दुकानदार श्रीमती ताराबाई नारायण कदम यांच्या विरुद्ध तहसील कार्याल चाळीसगाव यांच्या कडे प्राप्त तक्रारीची चौकशी व लाभार्थ्यांचे प्रत्यक्ष जबाब घेऊन चौकशीअंती सदर दुकानाचा परवानाच रद्द करण्याचे आदेश आज जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी काढले.
पुरवठा विभागाच्या तपासणीत सदर दुकानदाराच्या अनेक त्रुट्या आढळून आल्या त्यात प्रामुख्याने वजनकाटा मुदतीत पडताळणी करून घेतलेले प्रमाणपत्र तपासणी वेळी सादर केले नाही, दुकानात साठा फलक, दर फलक लावलेले नाही, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा मोफत तांदूळ वाटप केलेला नाही, लाभार्थ्यांशी अरेरावीची वागणूक, आदी त्रुट्या आढळून आल्याने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दुकानदार यांनी यांनी केलेला रेशन धान्य वितरणात केलेला गैरकारभार गंभीर असल्याचा ठपका ठेवत सदर दुकानाचे प्राधिकार पत्र आज रद्द केल्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी काढले.