<
भडगांव- (वार्ताहर)-तालुक्यातील तांदुळवाडी येथील जि. प. मराठी मुलांची शाळेच्या इमारतीला पन्नास वर्षे झाल्याने पुर्ण पणे शाळा जीर्ण दिसुन येत आहे. त्यात शाळेच्या भिंतला चारीबाजुन मोठमोठे खड्डे व तडे दिसुन येत आहे .तसेच इमारतीचा स्लाप जीर्ण झाल्यामुळे कोसळण्याची शक्यता दिसेन येत आहे त्यात एक ते चार वर्गालाच्या मुलांना बसायला देखील जागा नसल्याने मुख्याध्यापकांना व पालकांना चिंतेचा विषय बनला आहे.
जि. प. प्राथमिक मराठी शाळा वर्ग दुरूस्ती बाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी वारंवार प्रस्ताव देखील पंचायत समिती भडगाव यांच्याकडे पाच वेळेस पाठवून देखील त्याचे प्रतिउत्तर मिळालच नाही. पंनास वर्ष पूर्ण झालेली शाळेच्या इमारतीसाठी ग्रामपंचायतीने ठराव देखील पाठविललेला असतांना मुख्याध्यापकांच्या समजुतीसाठी दोन वेळेस सरकारी इंजिनीअरने आराखडा तयार करुन इमारती दुरुस्तीसाठी कुठलाही आक्षेप घेतला नाही.
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, श्री वसंत दादाभाऊ पाटील . अनिल युवराज खैरनार (सदस्य). प्रल्हाद संतोष पवार (पालक) .रविंद्र बोरसे (मुख्याध्यापक) शाळेत वारंवार या विषयावर चर्चा सत्र मांडत आहेत.
मुलांना शाळेत दररोज वर्गातील पाणी फेकाव लागत आहे अशा काही कारणाने मुलांच्या शिक्षणाला अडथळा येत आहे आणि केव्हा भिंत व स्लाप कोसळून जाईल त्या कारणाने 15 आँगस्ट नंतर मुलांना शाळेत पाठवणार नाही अशी पालकांमध्ये चर्चा ऐकण्यास येत आहे तसेच मुलांच्या जीवाला धोका असल्या कारणाने त्वरित मा. गट विकास अधिकारी भडगाव,व तालुक्याचे आमदार किशोर आप्पासाहेब पाटील व शासनाने त्वरित दखल घ्यावी अशी पालकांची अपेक्षा आहे