<
जळगांव(प्रतिनिधी)- श्री रामदेव बाबा मारवाडी मोची जिनगर समाज प्रगती मंडळांकडून जळगाव शहरातील समाज बंधुचे व्यवसाय काम धंदे कोरोना लाॅकडाऊन मुळे बंद असल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गरजू कुटुंबांना समाज प्रगती मंडळा तर्फे आपात्कालीन निधी मधुन किराणा व धान्य साहित्य वितरीत करणेत आले. यासाठी समाज प्रगती मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय साखला, उपाध्यक्ष गोकुळ चव्हाण, सचिव सुनील पवार, सर कार्यकारिणी सदस्य रतनलाल साखला, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, जेष्ठ मार्गदर्शक पूनमचंदजी चव्हाण, योगेश सोनग्रा, किरण राठोड, पारस साखला, चंद्रकांत साखला, माजी अध्यक्ष अशोक चव्हाण, कान्हा सिसोदिया, दिपक साखला यांनी विशेष परिश्रम घेतले.