<
फैजपूर(किरण पाटील)- फैजपुर शहरातील सिंधी कॉलनी मधील महिला पॉझिटिव आढल्याने पालिका, महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेत प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी किशोर चव्हाण, स.पो.नि प्रकाश वानखडे यांनी सिंधी कॉलनी चा परिसर सिल केला आहे. अतिशय लहान गल्लीबोळ्यात असलेल्या या परिसराला पूर्ण बॅरिकेट करण्यात आले आहे. रुग्णांच्या ट्रॅव्हल हिस्ट्री बाबत माहिती घेतली असता सिंधी कॉलनीतील हा परिवार गेल्या दीड महिन्यापासूनच अहमदाबाद येथे अडकून पडला होता हा परिवार ५ मे रोजी शहरात दाखल झाला. शहरात दाखल झाल्यावर या परिवाराने प्रशासनाला माहिती देऊन स्वतःला क्वारंटाईन करून घेणे गरजेचे होते मात्र तसे न करता हा परिवार दि.८ मे रोजी क्वारंटाईन झाला त्यामुळे त्या चार दिवसाच्या काळात सदर रुग्ण महिला कोणाच्या संपर्कात आले याचीही माहिती गोळा करणे प्रशासनाला क्रमप्राप्तच होणार आहे. शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील आढळलेले कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा निगेटिव्ह आढळलेला पती यांना जळगाव येथे रात्री उपचारासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली तर अधिक माहिती देताना मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी सांगितले की या महिलेवर उपचार करणारे डॉक्टर यांच्यासह अन्य ९ संशयितांना जे.टी महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापना करण्यात आलेल्या कोव्हीड सेंटर मध्ये विलगिकरण करण्यात आले आहे. तर अन्य २० ते २५ बाहेरगावाहून आलेल्या आलेल्यांना मुन्सिपल हायस्कूलमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे . प्रताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, स.पो.नि.प्रकाश वानखडे, मंडळाधिकारी जे.डी. बंगाळे, तालाठी प्रशात जावळे, नगरपरिषद व पोलीस कर्मचारी यांनी सिंधी कॉलोनी सह एक किलोमीटरचा चौफेर परीसर पुर्णतः सील केला आहे. प्राताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी लाऊड स्पीकर द्वारा शहरवासीयांना आपल्या भागात कोरोनाचा शिरकाव वाढू नये म्हणून सूचना करत लहान मुलांनी, जेष्ठ नागरिकांनी, विशेष काळजी घेऊन घरीच रहा, सुरक्षित रहा ! तोंडाला मास्क लावा, हात वारंवार धुवा, गर्दीचे होवू देऊ नका असे आवाहन केले आहे. त्याच प्रमाणे फैजपूर नगरपालिकेने सतर्कतेचा आवाहन करूत पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सह बाजीराव नवले, उज्वल सोनवणे, अमोल महाजन, निलेश दराडे, चंद्रकांत चौधरी, सुधीर चौधरी, रमेश सराफ, टी. एन.चौधरी, नरेंद्र बाविस्कर, शिवा नेहेते , हेमराज बढे , डी. व्ही.वाघामारे, विलास सपकाळे, दीपक सराफ, मुकेश हंसकर, दिनेश तेजकर , होमगार्ड व पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. गेल्या तीन महिन्यापासून सेफ झोन मध्ये असलेल्या फैजपुर शहरातील कोरोना चा शिरकाव हा दुर्दैवी असून शहरातील नागरिकांनी स्वतःचीच काळजी घेऊन बाहेर न फिरणे व बँक, भाजी बाजार व अन्य ठिकाणी गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करणे ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.