<
फैजपूर(किरण पाटील)- कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर फैजपूर येथील दि.अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ हजार रुपयाचा मदतिचा धनादेश दि.१६ रोजी फैजपूर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना सुपूर्द करण्यात आला. फैजपूर येथील दि.अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी तर्फे नित्याने समाजपयोगी उपक्रम राबविणे, संकटकाळी धावून येणे असे सेवाभावी कार्य ही संस्था करीत असते तसेच नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासत आली आहे. सध्या देशात कोरोनाचे संकट आहे म्हणून यानुसार सर्व संचालक मंडळाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जाणारे उपायांना मदतीसाठी शासनास ५१ हजार रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला. सदर धनादेश चेअरमन तथा जिल्हा दूध संघ संचालक हेमराज चौधरी व व्हा. नितीन राणे, संचालक चंद्रशेखर चौधरी व सेक्रेटरी सुनील क्षत्रिय यांनी ५१ हजार रुपयाचा मदतीचा धनादेश फैजपूर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना सुपूर्द केला यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण, पालिका कर निरीक्षक बाजीराव नवले हे उपस्थित होते.