<
चाळीसगाव(प्रतिनिधी)- सध्या संपूर्ण जगात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. भारत देशात २४ मार्च पासून रेल्वे, बससेवा आणि खाजगी व सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे यावर अवलंबून असणारे, उदरनिर्वाह करणारे अनेक कुटुंब उदा. रिक्षा टॅक्सी चालक व तत्सम यांचे व्यवसाय आणि उत्पन्न बंद झालेले आहेत. दैनंदिन जीवन जगणं अतिशय कठीण झाले आहे. चाळीसगाव येथे कृती फाउंडेशनच्या वतीने ज्यांची स्वतः च्या मालकीची रिक्षा नाही, दररोज अन्य मालकाची रिक्षा भाड्याने घेऊन आपला चरितार्थ चालवितात अशा रिक्षा चालकांना जीवनावश्यक वस्तू आणि किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले. सदर उपक्रम फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुजीत शांताराम माळी व कृतीचे मार्गदर्शक शांताराम माळी यांचे पुढाकाराने करण्यात आला. ही संकल्पना फाउंडेशनच्या सहसचिव जयश्री माळी यांनी मांडली होती. प्रसंगी प्रविण येवले, तुषार महाजन, स्पंदन माळी, हेमंत पाटील, मनिष माळी, गणेश पवार, सार्थक माळी यांचे अनमोल सहकार्य लाभले. तर मिलिंद डेरे पुणे, पी.एस.आय.फारुख तडवी, डॉ सुदिप चौधरी, डॉ स्वप्नील पाटील यांचे आर्थिक सहाय्य लाभले.