<
जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग
जळगाव,(प्रतिनिधी) – कोरोना संसर्गाच्या परीस्थीने सामान्य जनतेप्रमाणे पत्रकार घटक देखील अडचणीत आला आहे. कुठलाही भलामोठा पगार नसतांना पत्रकारिता करत राष्ट्रीय सेवा करून कोरोना योद्धा म्हणून काम करित आहे म्हणूनच पत्रकारांसासाठी राज्य शासनाकडे आर्थिक पॅकेज करिता पाठपुरावा करत असल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी आज जळगाव जिल्ह्यातील पत्रकार संघाच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दरम्यान बोलतांना सांगितले.
लॉकडाऊन सुरु झाल्या पासून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे हे राज्य भरातील पत्रकारांशी व्हिडीओ कॉन्सफरिंगच्या माध्यमातून परिस्थिती जाणून घेत असून पत्रकारांची वयक्तिक विचारपूस करित आहेत त्याच अनुषंगाने आज रविवार दि.१७ मे रोजी जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या सोबत व्हिडीओ कॉन्सफरिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी बोलतांना प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे म्हणाले की, कोरोनाचे संकट भयानक आहे. पत्रकारांनी काळजी घेत बातमी संकलन करावे व सामाजिक दायित्व म्हणून संघटनेच्या माध्यमातून गरजूना मदत देखील करावी असे अवाहन केले आहे.पत्रकार संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे पत्रकारांच्या विविध मागण्या राज्य कमिटीने रेटून धरल्या आहेत.पत्रकारांच्या हिताच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नसल्याचेही ते यावेळी बोलत होते.
पत्रकारांनी जोडधंदा करावा – प्रविण सपकाळे
कोरोना संकट काळात अनेक पत्रकारांना आर्थिक परिस्थिती भेडसावत आहे.परिस्थितीवर मात करून पत्रकारांनी जोडधंदा करावा त्याच बरोबर शासनाने नवीन उद्योजक सुरु करण्यासाठीचे धोरणात बदल केले असून एमआयडीसी भागात जागेसह शेड देखील उभारून देत आहेत या योजनेचा लाभ घेऊन पत्रकारांनी उद्योग क्षेत्रात यावे आवश्यकते नुसार पत्रकार संघ आपल्या पाठीशी खंबीर पणे उभा राहील असे मत जळगाव जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी व्हिडीओ कॉन्स्फरिंग दरम्यान व्यक्त केले.
या दरम्यान चर्चेत सहभागी झालेल्या प्रत्येकाने थेट प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्याशी संवाद साधत आपले विचार मांडले. यावेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुळकर्णी, वृत्त वाहिनी विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, वृत्तवाहिनी विभागाचे जिल्हा कार्यध्यक्ष संतोष ढिवरे, जळगाव महानगर कार्यध्यक्ष दीपक सपकाळे, चोपडा तालुका अध्यक्ष मिलिंद सोनवणे, जामनेर तालुका अध्यक्ष बाळू वाघ, महिला जिल्हाध्यक्ष नाजनीन शेख,जिल्हा उपाध्यक्ष संजय तांबे जळगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील सोनवणे, चेतन निंबोळकर हे सहभागी झाले होते.