<
फैजपूर(किरण पाटील)- शैक्षणिक वर्ष २०१९-२० एप्रिल व मेमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या महालेखाकार कार्यालयाने पेन्शन प्रस्ताव मंजूर केला असेल व महालेखाकार कार्यालयाने पेन्शन ऑर्डर अदा केली असेल अशा पेन्शनधारकांना पेन्शन प्राप्त करण्यासाठी ज्या त्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते. परंतु सद्यस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु होऊन संपूर्ण महाराष्ट्र ग्रासला आहे अशा परिस्थितीत प्रवासाची साधने नाहीत तसेच वाहतुकीस परवानगी नाही. जरी पेन्शन मंजूर झालेले असेल त्यांना ना हरकत प्रमाणपत्र ही गरजेची बाब आहे त्यामुळे राज्यातील सातही उपसंचालक कार्यालयांनी यांनी ज्या त्या जिल्ह्यासाठी प्रस्ताव ऑनलाइन मागवून ई मेल’द्वारा ना हरकत प्रमाणपत्र सादर करावेत किंवा कोषागार कार्यालयामध्ये ना हरकत प्रमाणपत्राचा इमेल करावा किंवा जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना अधिकार म्हणून ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार द्यावेत अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शैलेश राणे, सचिव प्रा.नंदन वळींकार, कार्याध्यक्ष प्रा. सुनील सोनार, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड व प्रा.डी.डी. पाटील यांनी केले आहे.