<
उस्मानाबाद:- जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून आजतागायत एकुण 799 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी उस्मानाबाद तालुक्यातील 168, तुळजापूर 145, उमरगा 206, लोहारा 52, कळंब 145, वाशी 11, भूम 19, परंडा 53 अशा व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 748 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 28 व्यक्तीचा अहवाल (Rejected) आला आहे. तसेच 17 व्यक्तींचे अहवाल हे अप्राप्त आहेत. तसेच परंडा 1, कळंब 3 व उमरगा 2, येथील व्यक्तींचे अहवाल पॉजिटीव्ह आलेले आहेत. लोहारा तालुक्यातील 1 अहवाल मुंबई येथे तपासणी करण्यात आलेला आहे. सदयस्थितीत 7 रुग्णांपैकी उमरगा व लोहारा येथील 3 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत व 2 रुग्ण उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे उपचार घेत आहेत तसचे 1 रुग्ण परंडा येथील उपजिल्हा रुग्णालायामध्ये उपचार घेत आहेत. कळंब येथील 1 रुग्णांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून दि 15 मे रोजी शासकीय वैदयकीय महाविदयालय सोलापूर येथे पुढील उपचारसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे. इतर जिल्हयातून व राज्यातून येणाऱ्या नागरीकांनी खालील आदेशाचे पालन करावे.
प्रत्येक व्यक्तीने आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे
1) इतर देशातून आलेल्या नागरीकांनी तात्काळ संस्थात्मक विलगीकरण कक्षात किंवा तात्पुरत्या स्वरुपात आयसोलेशन वार्डमध्ये भरती करुन स्वॅब घेण्यात यावा. स्वॅबच्या अहवालानंतर पुढील निर्णय वैदयकी अधिक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांनी संयुक्तपणे घेऊन कार्यवाही करावी.2) इतर जिल्हे, राज्यातून आलेल्या नागरीकांमधील लहान मुले (14 वर्षापर्यातची) मुली, महिला, वयोवृध्द, आजारी असलेल्या लोकांची नजीकच्या प्रा.आ.केंद्र, नागरी दवाखाना, आरोग्य वर्धनी केंद्रामध्ये तपासून घरी विलगीरकरणाचा सल्ला दयावा तसेच Stamping देखील करावे. यात 14 वर्षावरील मुले, तरुण इत्यादी व्यक्तींना मात्र शाळा, शेतघर इ. ठिकाणी त्यांचे सोईनुसार संस्थात्मक विलगीकरण करावे. 3) यात गाव पातळीवर स्थानिकाकडून बाहेर आलेल्या नागरीकांना अडवणे, प्रवेश न दणे, सेवा सुविधा न देणे असे प्रकार होणार नाहीत याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.4) Home किंवा Instituational Qurantine करताना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणेबाबत सुचित करावे व त्याची खात्री करावी.5) विलगीकरणातील प्रत्येक व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे व इतर कोणतेही लक्षणे दिसून आल्यास तात्काळ कोरोना साहाय्यता कक्षास अथवा गावातील आरोग्य कर्मचाऱ्यांना अवगत करणेबाबत संबधीतास प्रशिक्षीत करावे व अशा रुग्णांचा स्वॅब घेणे बाबत तालुका आरोग्य अधिकारी व वैदयकीय अधिक्षक यांनी निर्णय घ्यावा.6) तसेच गरोदर माता, जेष्ठ नागरीक व ज्यांना मधूमेह, उच्च रक्तदाब, पक्षाघात असे आजार असणारे नागरीक व तरुण मुली यांना होम क्वारंटाइेन करण्यात यावे व इतरांना Instituational क्वारंटाईन करावे. कोणतेही विलगीकरणाचा कालावधी हा 14 दिवस करण्यात यावा, यात कालावधी संपल्यानंतर वैदयकीय पथकाकडून ताप व ऑक्सीजन, Saturation याची तपासणी करुनच संबधितांस सोडण्यात यावे. आशा सुचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहेत.