<
उस्मानाबाद :- जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत 28 व्यक्तींचे स्वाबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 25 व्यक्तीच्या स्वाबचे अहवाल निगेटिव्ह असून तीन व्यक्तींच्या स्वाबचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे. तसेच आजच्या तीन कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींपैकी दोन व्यक्ती या कळंब तालुक्यातील हावरगाव येथील असून एक व्यक्ती भूम तालुक्यातील पन्हाळवाडी येथील आहे. या तिन्ही व्यक्ती मुंबई येथून प्रवास करून आलेले आहेत, असे डॉ. गलांडे यांनी सांगितले.