जळगाव- डॉक्टर व कर्मचाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या काढ्याचे वितरण भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक आमदार गिरीश भाऊ महाजन यांचा आज वाढदिवस होता वाढदिवसाच साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आव्हान आमदार गिरीश भाऊ यांनी केले होते त्याचा आव्हानाला अनुसरून जीएम फाउंडेशन व निरामय शिवा फाउंडेशन यांनी अतिशय साध्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस वैद्यकीय महाविद्यालय मध्ये साजरा केला.
यावेळी करोना या वैश्विक महामारी च्या संकटात रुग्णसेवा करण्याचे करणाऱ्या (केव्हिड योध्धा) आरोग्य कर्मचाऱ्यांना या काढायचे वितरण करण्यात आले आयुष मंत्रालय भारत सरकार यांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सदरचा काढा सुचविलेला आहे या काढ्यामध्ये काळेमिरे दालचिनी तुळस काळा मनुका सूट तसेच जळगावच्या हवामानाला विचारात घेऊन गुळवेल व हिरडा यांचा संयुक्त काढा तयार करण्यात आलेला आहे सदरचा काळात दोन कप पाण्यामध्ये एक ग्राम चूर्ण टाकावे व ते उकळून एक कप पाणी झाल्यानंतर पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे.आयुष्य मंत्रालयाने भारत सरकार यांनीही या काढायची शिफारस केलेली आहे आज गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जीएम फाउंडेशन व निरामय सेवा फाउंडेशन यांच्या वतीने त्यांचा अभिनव वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी खालील मान्यवर उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे विनोद कोळी संदीप कासार सहकार्यवाह योगेश चौधरी डॉक्टर दिपक वाणी सुस्रुत मुळे सारंग जोशी या उपक्रमात डाँ. क्षितिज गर्गे यांचे अनमोल सहकार्य मिळाले जीएम फाऊंडेशन अरविंद देशमुख यांनी आभार वेक्त केले.