१० रोजी १ दिवस १५० कर्मचारी आंदोलन करणार
जळगाव ;– येथील एमजे महाविद्यालयात नुकताच एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती . त्या पार्शवभूमीवर नूतन मराठा महाविद्यालयात गुंडगिरी वाढली असून या गुंडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांनी आज महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. एलपी देशमुख म्हणाले कि , गेल्या वर्षभरात विजय भास्कर पाटील,मनोज भास्कर पारित,पियुष पाटील यांनी साथीदारांसह नूतन महाविद्यालयाच्या आवारात शिक्षकेतर कर्मचारी,सुरक्षा रक्षक,यांच्यावर हल्ले चढवून दहशत निर्माण केली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनला वेळोवेळी तक्रायी देण्यात आल्या आहेत. या आरोपींचे जामीन नाकारण्यात आले आहेत. जिल्हापेठ पोलीस आरोपींवर कारवाई करण्यास का टाळाटाळ करीत आहे असा सवाल प्राचार्य देशमुख यांनी विचारला. विजय भास्कर पाटील,मनोज भास्कर पारित,पियुष पाटील आदींवर कारवाई न झाल्यास १० रोजी नूतन मराठा महाविद्यालचे सुमारे दीडशे कर्मचारी १ दिवस काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे . मात्र यापुढेही कारवाई न झाल्यास कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्यावतीने बेमुदत कामबंद करणार असल्याची माहिती दिली.