मी अमोल मिटकरी आमदार म्हणून शपथ घेतो की….
हे शब्द थोड्याच वेळात ऐकायला पडतील.
त्यावेळी ,शारदा नगर बारामती येथे सभेत आपण हजारोंच्या साक्षीने एक शब्द दिला होता. की येत्या काळात मी अमोल ला आमदार केल्याशिवाय राहणार नाही,या शब्दाची आठवण झाली आणि दादा खरोखरच आपला कार्यकर्ता म्हणवून घेणे सुद्धा आम्हाला अभिमान वाटतो.
राजकारण म्हटले की अनेकांच्या नजरा आज आमच्याकडे संशयाच्या नजरेने बघितलं जातं. नेता आणि कार्यकर्ता या नात्यावर तर कोणीच विश्वास ठेवायला तयार नाही. फक्त निवडणूक आली की पुढाऱ्यांना कार्यकर्ता आठवतो ही अशी जुन्या जाणकार मंडळींचे शब्द ऐकायला मिळते. पण दादा आज तुम्ही दिलेला शब्द पूर्ण केल्यानंतर. आपल्यासारख्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून काम करत असताना आजचा दिवस आजचा आनंद आम्हा कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेना राजकीय जीवनात प्रवेश करत असताना आमचा आजोबा आमदार नव्हता किं साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नव्हता. वडील म्हणलं तर साखर कारखान्यात काम करणारा.आणि आपलं नेतृत्व महाराष्ट्र वर आपलं नेतृत्व सिद्ध करत असतानाच. जे पोटात तेच ओठावर असणारे नेते म्हणून आपली ओळख महाराष्ट्रात निर्माण होत असताना, आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या नेतृत्वाची पताका खांद्यावर घेऊन काम करत असताना, कार्यकर्त्यांच्या अडचणीच्या वेळी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, वेळ कोणतीही असो, माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय हा मिळालाच पाहिजे. ही आपली असणारी भावना हे मी स्वतः अनेक वेळा अनुभव आलेला आहे
रोजगार हमीवर काम करणारे स्वर्गीय आर आर आबा या राज्याचे उपमुख्यमंत्री या उच्च पदापर्यंत काम करण्याची संधी आदरणीय पवार साहेबांनी आर आर आबा यांना दिली. आणि राजकीय पटलावर सुवर्णाक्षरांनी आर आर आबांचं नाव कोरले गेलं एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदापर्यंत फक्त पवार कुटुंबच त्याच्या कार्याला आणि त्याच्या निष्ठेला न्याय देऊ शकतो. हे साहेबांच्या कामातून अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला आहे. आणि दादा पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाने अमोल दादा मिटकरी यांच्या शपथविधीने पुन्हा महाराष्ट्र दाखवून दिले आहे की सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला एक व्याख्याता , सर्व दिग्गज नेते पक्ष सोडून जात असताना,कोणतीही अपेक्षा न ठेवता,हा अमोल दादा अडचणीच्या काळात पक्षाच्या बाजूने उभा राहिला म्हणून आपण त्यांना दिलेला शब्द आज पाळत असताना आम्हाला खरोखर चा अभिमान वाटतो.
मध्यंतरीच्या काळात नेता आणि कार्यकर्ता या नात्यावर जणू काजळी निर्माण झाली होती. पण दादा ज्या वेळेपासून या महाराष्ट्रात अजितपर्व चालू झाले. त्यावेळी पासून निष्ठावंत कार्यकर्ता व पक्षासाठी इमानेइतबारे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका आपण घेतली. त्यामुळे असंख्य कार्यकर्ते आपल्या दिलदार नेतृत्वाकडे आकर्षित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे.
राजकारणात घराणेशाही आली अन ती ठाण मांडून बसली. मी,नंतर माझा मुलगा, नंतर माझा नातू , असा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी एकेकाला भरभरून दिले ते मात्र पक्ष अडचणींमध्ये आलेला पाहून सोईचे राजकारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अडचणीत सोडून गेले.
पण जो कार्यकर्ता त्याच्याजवळ निष्ठे शिवाय आणि प्रामाणिकपणे शिवाय काहीच शिल्लक नाही, ना राजकीय वारसा, ना आर्थिक पाठबळ आहे, असा कार्यकर्ता मात्र पक्षावर आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हा फटका कार्यकर्ता मात्र राष्ट्रवादी पक्षाशी इमानेइतबारे पक्षाचे काम केले. हे काम करत असताना पक्षाकडून मला काहीतरी मिळेल ही त्या कार्यकर्त्याने अपेक्षा ही केली नाही.
त्याच काळात आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी या फाटक्या कार्यकर्त्यांना एक शब्द दिला. येत्या काळात पक्षाला चांगले दिवस आले तर हा पुढील काळ अडचणीच्या काळात जे कार्यकर्ते पक्षाच्या बाजूने उभा राहिलेल्या कार्यकर्त्यासाठी असेल, मग तर त्या फाटक्या कार्यकर्त्याला आभाळाही ठेंगणे पडलं म्हणून त्यांनी दिवस-रात्र एक करून भाजपसारख्या पक्षाच्या विरोधात प्रचार यंत्रणा डोक्यावर घेतली , राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी सज्ज झाले विधानसभेचा निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रामाणिक कामाची जबाबदारी पार पाडली. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून या भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपलेला आहे. म्हणून हिणवले त्या भारतीय जनता पार्टी चे 105 आमदार निवडून येऊन सुद्धा क्रमांक एकचा असणारा पक्ष सुद्धा विरोधी बाकावर बसवू शकतो हे वयाच्या 80 व्या वर्षीही दाखवून दिले. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी राजकारणाच्या इतिहासावर पुन्हा एकदा आपला पवारनीतीचा डाव टाकून दाखवून दिले.
दादा आपण सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्रीच्या 12 वाजेपर्यंत जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्पर असणारा नेता म्हणून असलेली ओळख निर्माण केली असतानाच आज दिलेला शब्द पळणारा नेता म्हणून ही बिरुदावली आपल्या नावापुढे लागत असताना आम्हालाही दादा आपला कार्यकर्ता म्हणून घेणे अभिमानास्पदच आहे
श्रीकांत शिंदे
प्रदेश सचिव
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस