कळंब | प्रतिनिधी हर्षवर्धन मडके
राज्यात कोरोना विषाणू परिस्थिती वर लॉक डाऊन मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. या अनुषंगाने अनेक गावे वेगवेगळ्या प्रकारची शक्कल लढवत आहेत.
कोरोना पार्श्वभूमीवर कळंब तालुक्यातील मोहा गावात प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी गस्त घालण्यासाठी आणि विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना आळा घालण्यासाठी आहेत कोरोना वॉरियर्स युवकांची टीम तयार करण्यात आली आहे.
कळंब तालुक्यातील मोहा गावात येणारे प्रमुख रस्त्यांवर तसेच प्रत्येक गल्लीमध्ये कोरोना वॉरियर्स कोरोंना विरुद्धच्या लढाईत उतरले आहेत. याचं कारण मोहा गावामध्ये आसपासच्या पाच ते सहा गावांचा संबंध येतो,त्यामुळे याठिकाणी किराणा दुकानात, बँकेत, दवाखाना ,अशा अनेक कामानिमित्ताने बाहेर गावच्या नागरिकांची वर्दळ असते, लॉकडाऊनच्या काळात विविध कारणे देऊन गावात ये-जा करणायांच्या संख्येत वाढ झाल्याने गावामध्ये हे कोरोना वॉरियर्स टीम तयार करण्यात आली आहे.
मोहा येथील सरपंच राजू झोरी ग्राम विकास अधिकारी सी एन लोकरे , माजी सरपंच बाबा मडके, पोलिस पाटील प्रकाश गोरे , तंटामुक्ती अध्यक्ष निरंजन दत्त पाटील तंटामुक्ती उपाध्यक्ष अंकुश मडके, सहशिक्षक संजय मडके , ग्रामपंचायत कर्मचारी सुदर्शन मडके , जमीर शेख , तसेच सलीम मोमीन , जावेद सय्यद आणि कोरोनास वॉरियर्स म्हणून नियुक्त केलेले १० युवक हे या मोहा गावामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची चौकशी करून गावामध्ये प्रवेश देत आहेत. तसेच गावामध्ये विनाकारण गर्दी करु नका मास्कचा वापर करा अशा सुचनाही देत आहेत.परंतु अनेकदा सांगुन ही काही मास्क वापरत नाहीत अशा व्यक्तींवर कार्यवाही करण्यात येत आहे.
तसेच मुंबई पुणे येथून गावी परतलेल्या व्यक्तींना मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात quarntine केले आहे. Quarantine केलेल्या व्यक्तींना कोरोना वॉरियर्स च्या युवकांनी प्रोत्साहन दिले आणि योग्य त्या सूचना दिल्या.
त्यामुळे गावात विनाकारण फिरणाऱ्यांवर जरब बसत आहे.
मोहा गावातील प्रशासनाने तसेच कोरोना वॉरियर्स च्या युवकांनी आपल्या गावाची सेवा करण्याचा घेतलेला निर्णय इतर गावानीही घेण्याची गरज आहे.परिसरातील ग्रामस्थ व शासकिय स्तरातील अधिकारी वर्गातुन या कोरोना वॉरियर्स चे कौतुक होत आहे.