<
जळगांव(धर्मेश पालवे):-राष्ट्रीय जंत दिवस सण 2015 पासून 10 फेब्रुवारी या दिवशी साजरा होतो, या दिवशी देशातील 1 ते 19 वर्षा पर्यंत च्या सर्व मुलांना जतांची गोळी मोफत दिली जाते, यामध्ये सर्व शासकीय व सरकारी मदत मिळणाऱ्या शाळा आणि अंगणवाड्या याचा समावेश आहे. सरकारी आरोग्य खात्याकडून हा कार्यक्रम राबवण्यात येतो. या वर्षी 10 फेब्रुवारीला मोहिमेच्या पहिल्या फेरीत देशातील महाराष्ट्र राज्यातील 16 लाख बालकांना व विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता आला, त्यामध्ये जळगांव उत्तर महराष्ट्रात जळगांव धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यातील बालक व विद्यार्थ्यांना ही या योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित होते.दर तीन महिन्यांनी व दोन फेरीत हे अभियान राबवणे शहरी व ग्रामीण शालेय आरोग्य विभागाकडून अपेक्षित असताना, मात्र सर्व शहरी व ग्रामीण शाळेत अजूनही दुसऱ्या फेरीच्या जंताच्या गोळ्या वितरित केल्या गेल्या नाही असं चित्र आहे.काही शाळेच्या पालकांनी या विषयी गाभिर्याने दखल घेत चौकशी केली असता शाळेतील व्यवस्थापनाने वरून च आम्हाला औषधी साठा मिळत नसल्याचं सांगितले आहे असे म्हटले आहे. तर शहरी भागात काही शाळांना तुटक तुटक स्वरूपात औषधी मिळत आहेत असा सुर आहे.
तरी ,जिल्ह्यात सरकार दरबारी याची खबरदारी घेतली जात नसून भर पावसात जंत नाशक गोळ्या शालेय आरोग्य तपासणी विभाग,व तत्सम विभागाकडून या कडे दुर्लक्ष होत आहे,अशी बोंब सर्वत्र होत आहे.