उस्मानाबाद:- लॉकडाऊन काळात खालील बाबतीत गैरवर्तन , उल्लंघन केलेल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हा दंडाधिकारी यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलिस दलातील १८ पोलिस ठाणे आणि इतर शाखा मार्फत खालील चार प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
१)सार्वजनिक ठिकाणी थुंकणे : ११९ कारवायांत – २३,४००/- रू. दंड वसूल झाला आहे.
२)सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे : २५ कारवायांत -१२,५००/- रू. दंड वसूल झाला आहे.
३)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींत सुरक्षित अंतर न राखणे : सोशल डिस्टनसिंग टाळून दुकानासमोर गर्दी निर्माण केली इत्यादी प्रकरणांत ६६ कारवायांत – १५,३००/- रू. दंड प्राप्त झाला आहे.
४)जीवनावश्यक वस्तू दुकानासमोर दर पत्रक न लावणे : किराणा दुकाना समोर दरपत्रक न लावणाऱ्या दुकान चालकाविरुद्ध ८ कारवायांत ७,५००/- रू. दंड प्राप्त झाला आहे.
५) कार- मोटारसायकल वर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाऊनकाळातमोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी १३ कारवायांत ८,५००/- रू. दंड प्राप्त झाला आहे.