Wednesday, July 9, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आँस्ट्रेलियातील अनिवासी भारतीय; कृती फाऊंडेशनच्या माध्यमातून लॉकडाउन काळात विविध उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आँस्ट्रेलियातील अनिवासी भारतीय; कृती फाऊंडेशनच्या माध्यमातून लॉकडाउन काळात विविध उपक्रम


जळगाव(प्रतिनिधी)- सातासमुद्रापार वास्तव्य करीत असलेल्या ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीयांनी मायभूमी वर आलेल्या कोरोना महामारी विरूध्दच्या लढाईत “कोविड-19 रिलिफ” या मोहीमेत सहभाग नोंदवला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आल्यापासून “कृती फाऊंडेशन” समाजातील निराधार, निराश्रित, वंचित, दुर्लक्षित व गरजू लोकांच्या मदतीसाठी अनेकविध उपक्रम राबवित आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्रशासकीय सेवेत प्रथम आघाडीवर काम करणाऱ्यांना पोलीस प्रशासन, अग्निशमन, आरोग्य सेवा, टपाल सेवा, सफाई कामगार इ.मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सँनिटायझर, मास्क, पाण्याच्या बाटल्या इ.चे वाटप तसेच अत्यंत हलाखीच्या परीस्थितीत जीवन जगणाऱ्यांना म्हणजे मोलमजुरी करणारे श्रमिक, घरकाम करणाऱ्या महीला, विटभट्टी मजूर, बांधकाम क्षेत्रातील मजूर, समाजातील दुर्लक्षित व तिरस्करणीय असलेले ट्रान्सजेंडर्स, कलावंत, मिडीयातले कर्मचारी यांना किराणा सामानाचे वाटप तर मधुमेही, उच्च रक्तदाब, हृदय रोगी, यासारख्या अतिसंवेदनशील रूग्णांना डिजिटल मार्गदर्शन व समुपदेशन करणे, कोरोनामुळे लहान मुलांमध्ये कोरोना बाबत जागृती व्हावी म्हणून ग्लोबल चित्रकला स्पर्धेच आयोजन करणे यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.

कृती फाऊंडेशनची एक टीम आँस्ट्रेलिया मध्ये “कृती वेल्फेअर आँस्ट्रेलिया” या नावाने भारतातील महीला, ज्येष्ठ नागरिक व बालकांच्या पुन:रूत्थापनासाठी सतत विविध प्रकारच्या कार्यक्रमातून मायभुमीतील या घटकांसाठी निधी संकलीत करीत असते. मायभुमीतील नागरिकांवर आलेल्या कोविड-19 च्या संकटाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीयांना नेहमीप्रमाणे मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्याला भरभरून प्रतिसाद देत अनिवासी भारतीय “कृती”च्या कार्यात सहभागी झाले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सह्माद्री सिडनी, मराठी कट्टा, मराठी असोसिएशन सिडनी, आकाशवाणी सिडनी, हिमालयन नेपाल लायन्स क्लब यासारख्या संस्थांबरोबरच अनेक अनिवासी भारतीयांनी आर्थिक योगदान दिले आहे. त्यामध्ये प्रशांत बेर्डे, आनंद शेवाळे, नलिनी महाजन, भाऊसाहेब पाटील, विशाल गोकुळे, सिध्दी महाजन, नितीन चौधरी, रवी चुत्तर, जान्हवी महाजन, रूपेश दारवटकर, अनिल कांदळकर, योगेश चव्हाण, अतूल जमदाडे, चैतन्य पेशवे यांनी विशेष सहकार्य केले. आकाशवाणी सिडनीने अनिवासी भारतीयांना निधी संकलनासाठी कोणतेही शुल्क न आकारता विनामूल्य आवाहन करून या उपक्रमांसाठी निधी उभारण्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. कोरोनाच्या रूपाने आलेल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीयांनी उभारलेला हा निधी मायभुमीतील विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी “कृती”राबवित असलेल्या उपक्रमांसाठी वापरण्यात येत आहे. यापूर्वी सुध्दा ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीयांनी जळगाव जिल्ह्यातील थँलेसेमियाग्रस्त बालकांच्या मदतीसाठी तसेच मायभुमीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी चँरीटी कार्यक्रमाच्या आयोजनातून निधी संकलित केला होता. त्या निधीतून इंडियन रेडक्राँस सोसायटी, जळगाव जिल्हा शाखेला जर्मन बनावटीचे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळीची तपासणी अत्यंत कमी वेळात व माफक दरात करणारे “कोंबो लँब” हे उपकरण देण्यात आले होते. थँलेसेमिया बालकांना रक्त संक्रमण करण्यासाठी हे उपकरण अतिशय वरदान ठरले आहे. “कृती वेल्फेअर ऑस्ट्रेलिया”चे संस्थापक शेखर महाजन व त्यांच्या सुविद्य पत्नी स्वप्ना महाजन यांच्या नेतृत्वाखाली भारतातील महीला, ज्येष्ठ नागरिक व बालकांच्या पुन:रूत्थानासाठी सतत विविध प्रकारच्या कार्यक्रमातून मायभुमीतील या घटकांसाठी निधी संकलित करीत असते. त्यामध्ये मकार्थूर रिजनचे फेडरल सांसद सदस्य व बालरोग तज्ज्ञ डॉ. माईक फिलँडर, भारताचे आँस्ट्रेलियातील उच्चायुक्त डॉ.अजय गोंडाने इंडियन कान्सुलेट जनरल एस.के.वर्मा, एसबीएस रेडीओच्या कुमूद मिराणी, लायन्स क्लबच्या जसामन सेठी, जाँन काँप्सन व पदाधिकारी यांचे सतत सहकार्य मिळत असते.

विदेशात रहात असतांना भारतीय संस्कृती, इतिहास लहान मुलांना कळायला हवा म्हणून सिडनी सह्याद्रीची स्थापना करण्यात आली आहे. शिवजयंती, दिवाळी, नवरात्र या सारखे सण एकत्ररित्या साजरे केले जातात. कृती फाऊंडेशनच्या ध्येय व उद्देशाने प्रेरीत होऊन आम्ही त्यांच्या उपक्रमांमध्ये सहभागी झालोत.
प्रवक्ता
सह्याद्री सिडनी

“क्रुती वेल्फेअर आँस्ट्रेलिया” गेल्या सहा वर्षांपासून सिडनी येथे कार्यरत आहे. सातासमुद्रापार रहात असतांना आपल्या मायभुमीतील रंजल्या गांजल्या लोकांच्या मदतीसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यातून मिळणारा निधी प्रामुख्याने देशातील ग्रामीण भागातील महीला, बालके व ज्येष्ठ नागरिकांच्या पुन:रूत्थापनासाठी केला जातो. त्याच बरोबर आतापर्यंत नेपाळ, लेआँन, साँलोमन आयलँड, पापूआ, फिजी, न्यू गिनीआ, सोमालिया, सिरिया, आँस्ट्रेलिया, या देशातील आपतग्रस्तांना मदत केली आहे.
शेखर महाजन
संस्थापक अध्यक्ष
कृती वेल्फेअर आँस्ट्रेलिया

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन दिनांक १७.०५.२०२० रोजी २३१ पोलिस कारवायांत ६७,२००/- रू. दंड वसूल

Next Post

फैजपूरच्या सदगुरु हॉस्पिटलमध्ये नागरिकांची तपासणी व औषध उपचार; तज्ञ डॉ.अमित हिवराळे यांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला

Next Post
फैजपूरच्या सदगुरु हॉस्पिटलमध्ये नागरिकांची तपासणी व औषध उपचार; तज्ञ डॉ.अमित हिवराळे यांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला

फैजपूरच्या सदगुरु हॉस्पिटलमध्ये नागरिकांची तपासणी व औषध उपचार; तज्ञ डॉ.अमित हिवराळे यांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications