Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयाचे वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टर्स कोरोनाबाधित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयाचे वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टर्स कोरोनाबाधित

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले

मुलुंडच्या एम एमटी अग्रवाल रुग्णालयाच्या सहा जणांना कोरोणाची लागण झाली असून त्यात दोन डॉक्टर तर चार वार्डबॉयचा समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना या कोरोना विरुध्दच्या लढ्यात योद्ध्यांचे कार्य करणाऱ्या पालिकेच्या डॉक्टरांना व कर्मचारी वर्गाला देखील कोरोनाचा संसर्ग होत असल्याने अग्रवाल रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी चिंतेत आहेत.मुलुंडमध्ये झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. मुलुंडमधील पालिकेच्या एमटी अग्रवाल रुग्णालयात कोविड १९ उपचार केंद्र सुरू करण्यात आल्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढती आहे. परिणामी या रुग्णांची सेवा करताना, त्यांच्यावर उपचार करताना येथील आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असून काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील या रोगाची बाधा झाली असून त्यात चार वार्डबॉय व दोन डॉक्टरांचा समावेश असल्याचे समजले. काही दिवसांपूर्वी येथील एका वार्डबॉयला कोरोणाची लागण झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या इतर तीन वार्डबॉयची तपासणी केली असता त्याचा रिपोर्ट देखील पॉज़िटिव आल्याचे आढळून आले आहे. या चौघांनाही विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तसेच मुलुंड पूर्व येथील मिठागर शाळेचे कोविड सेंटर उभारण्यात महत्वाची भूमिका बजावणारे व एमटी अग्रवाल रुग्णालयात कार्यरत असलेल्या दोन डॉक्टरांना देखील कोरोणाची बाधा झाली असून त्यांच्यावर देखील उपचार करण्यात येत असून उपचाराला या सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचे सूत्रांकडून समजले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फैजपूरच्या सदगुरु हॉस्पिटलमध्ये नागरिकांची तपासणी व औषध उपचार; तज्ञ डॉ.अमित हिवराळे यांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला

Next Post

मुलुंड पश्चिम येथील विलगिकरण कक्षात तरुणीचा दुर्दैवी अंत

Next Post

मुलुंड पश्चिम येथील विलगिकरण कक्षात तरुणीचा दुर्दैवी अंत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo