Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुलुंड पश्चिम येथील विलगिकरण कक्षात तरुणीचा दुर्दैवी अंत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले 

मुलुंड पश्चिम येथील नव्याने बनविण्यात आलेल्या रिद्धि-सिद्धी विलगिकरण कक्षामधील शौचालयात एका तरुणीचा संशयास्पद मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 
५ मे रोजी मुलुंड येथील  रिद्धि-सिद्धी विलगिकरण कक्षात एका तरुणीला ठेवण्यात आले होते. ही तरुणी एका कोरोनाग्रस्ताच्या वाढदिवसाला गेली होती व तेथेच तिला संसर्ग झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून तिला मुलुंडमधील विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तिथे तिची कोविड १९ चाचणी करण्यात आली होती परंतु चाचणीचा रिपोर्ट अद्याप आला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी तिला क्षयरोगाची बाधा झाली होती. त्यामुळे तिच्यावर क्षयरोगाशी संबंधित उपचार चालू होते. शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेत ही तरुणी शौचालयात गेली, परंतु बराच वेळ झाला तरी ती बाहेर न आल्याने तेथील इतरांनी दरवाजा ठोकावून पाहिला परंतु आतून काहीच उत्तर न आल्याने अखेर विलगिकरण कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सदर तरुणी बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तोपर्यंत तिचा मृत्यु झाला होता. 
दुसऱ्या दिवशी सदर तरुणीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे तिचा मृत्यु क्षयाचा स्ट्रोक आल्याने झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याची माहिती मुलुंड पोलिसांकडून देण्यात आली. मुलुंड पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून पुढील अधिक तपास याप्रकरणी सुरू केला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयाचे वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टर्स कोरोनाबाधित

Next Post

शिवसेना मुलुंड विधानसभेतर्फे कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या सामाजिक कार्याविषयी कार्यालय प्रमुख सीताराम खांडेकर यांच्याशी केलेली बातचीत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo