<
जामनेर-( प्रतिनिधी) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सभागृहामध्ये घस्कॅपल फाउंडेशन,जामनेर(पुणे).यांच्यावतीने बंजारा समाजामधील इ.१०’वी,१२’वी तसेच पदविधर गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव तसेच समाजातील विविध क्षेत्रामधील-सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या समाजसेवक आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी गोर बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री.संत सेवालाल महाराज, श्री.प.पु लक्ष्मण चैतन्य बापू व हरीत क्रांतीचे प्रेणेते,महानायक-वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात येऊन उपस्थित मान्यवरांचा फाउंडेशन चे अध्यक्ष-मा.नामदेवराव चव्हाण,सचिव-सुमित चव्हाण,सरचिटणीस-डॉ.श्याम चव्हाण,खजिनदार-लालचंद चव्हाण,यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष-डॉ.एन.एस.चव्हाण(जिल्हा शल्य चिकीत्सक,जळगांव),तर उद्घाटक-मा.श्री.सुभाषभाऊ देशमूख(गटविकास अधिकारी),हे होते.तर,विशेष अतिथी-राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष-आत्मारामभाऊ जाधव,राष्ट्रीय उपाध्यक्ष-मदनभाऊ जाधव,अ.भा.बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष-कांतिलालभाऊ नाईक,दलितमित्र-मोरसिंगभाऊ राठोड,समाजसेवक-अरुणभाऊ पवार,सेवानिवृत्त कामगार अधिकारी-डि.सी.राठोड(मुंबई) मा.जि.प.सदस्य-लखुसिंग नाईक,समाजसेवक-रमेशभाऊ नाईक,देलसिंग नाईक,दौलतभाऊ पवार,मुलचंदभाऊ नाईक,राजेशजी नाईक,नटवर चव्हाण,आबा राठोड,बाबुसिंग राठोड,यांच्यासह अनेक मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये जामनेर तालुक्यातील बंजारा समाजातील सुमारे ६० विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र,शाल,श्रीफळ,पुष्पहार तसेच वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला.याचबरोबर समाजातील महाराष्ट्रातील सुमारे 53 सामाजिक,सांस्कृतिक व ईतर क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेवक तसेच मान्यवरांचा देखील विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मार्गदर्शनपर भाषणे केलीत.यावेळी,जामनेर तालुक्यातील विध्यार्थी पालकवर्ग आणि बंजारा समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.