Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातून आतापर्यंत 316 बसेसमधून 7 हजार प्रवासी रवाना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्ह्यातून आतापर्यंत 74 बसेसमधून मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या सीमेपर्यंत 1628 प्रवासी रवाना


जळगाव, दि. 18 (जिमाका) – जिल्ह्यातून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या तीन राज्यांच्या सीमेपर्यंत 273 बसेसद्वारे 6006 प्रवाश्यांना तसेच दिल्ली येथून रेल्वेने आलेल्या विद्यार्थ्यांना 19 जिल्ह्यापर्यंत तर वाशिम जिल्ह्यातील मालेगावपर्यंत कामगार, मजूर यांच्यासाठी 43 बसेसमधुन 946 प्रवाशांना याप्रमाणे आतापर्यंत 316 बसेसमधून 6952 प्रवाशांना पोहचविण्यात आल्याची माहिती एस. टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रण राजेंद्र देवरे यांनी दिली. एसटी बसमार्फत कामगार, मजूर, विद्यार्थी यांना रवाना करण्यापूर्वी या सर्वांची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करण्यात आली.


लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परराज्यातील मजूर, कामगार यांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार या मजूरांना सोडण्याची आवश्यक ती कार्यवाही व खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहे. त्यानुसार संबंधित उपविभागीय अधिकारी, तालुक्यांचे तहसीलदार, पोलीस अधिकारी यांनी पायी जाणाऱ्या मध्यप्रदेश, तेलंगाणा आणि छत्तीसगड या राज्यांतील मजुरांना एसटी महामंडळाची बससेवा उपलब्ध करून दिली आहे. या नागरिकांना विविध सामाजिक संस्था, व्यक्तींमार्फत फूड पॅकेट देण्यात आले. तसेच त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली, सॅनिटाईज करुन त्यांना रवाना करण्यात आले. तत्पूर्वी सोशल डिस्टन्सिगचे पालन, मास्कचा वापर या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. यावेळी एस.टी. महामंडळासह महसुल, पोलीस, आरोग्य विभाग व परिवहन विभागाचे अधिकारी मेहनत घेत आहे.
जळगाव हा जिल्हा मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर जिल्हा असल्याने याठिकाणी इतर जिल्ह्यातून पायी आलेले अनेक मजूर लॉकडाऊनमुळे अडकले होते. शासनाच्या निर्णयानुसार या मजूरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या मजूरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत तसेच दिल्ली येथून रेल्वेने आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यापर्यंत तर राज्यांतर्गत वाशिम जिल्ह्यातील मालेगावपर्यंत एसटी महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील विविध आगारातून 316 बसेस सोडण्यात आल्या. यामध्ये चोरवड या मध्यप्रदेश राज्याच्या सीमेपर्यंत 201 बसेस, देवरी या छत्तीसगड राज्याच्या सीमेपर्यंत 71 बसेस व दिलोरा या तेलंगाणा राज्याच्या सीमेपर्यंत 1 आणि दिल्ली येथून रेल्वेने आलेल्या तसेच राज्यातील मालेगाव, (जि. वाशिम) येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी 43 बसेस याप्रमाणे गेल्या दहा दिवसात 316 बसेसमधून एकूण 6 हजार 952 प्रवाशांना या राज्यांच्या सीमेपर्यंत व राज्यातंर्गत रवाना करण्यात आले. आज ( 19 मे रोजी) एका दिवसात मध्यप्रदेशसाठी 2 बसेसमधून 44 तर छत्तीसगडसाठी 4 बसेसमधून 88 असे एकूण 6 बसेसमधून 132 प्रवासी रवाना करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुलुंड नवघर पोलिस ठाण्यातील पोलिसाला कोरोणाची लागण

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज तेवीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज तेवीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज तेवीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo