जळगाव, (प्रतिनिधी) – वरणगाव येथे आज एक 52 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आढळून आला असून या रुणालयाच्या घरच्यांना भुसावळ येथील कोविड केअर कक्षात कॉरंटाईन करून त्यांचे देखील स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात येईल असे वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.घोषाल यांनी सांगितले.जळगाव येथील कोविड रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरु आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीं वरणगाव येथील हिना नगर, कुरेशी बिल्डिंग असल्याने हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून प्रशासन जाहीर करणार आहे.