उस्मानाबाद,दि.19(जिमाका):- महाराष्ट्र शासनाने कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 31 मे 2020 पर्यंत वाढविला आहे.या लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.जिल्हाधिकारीतथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनीत्यांना प्राप्त अधिकारांनुसार कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 31 मे 2020 पर्यंत वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत पेट्रोल पंप,महामार्गावरील पेट्रोल पंप,बी-बियाणे व खते या कृषि निविष्ठांची विक्री करणारी दुकाने, आस्थापना,बिज प्रक्रिया केंद्र,त्यानुषंगीक बियाणे पॅकींग,हाताळणी केंद्र,बीज परिक्षण प्रयोगशाळा कृषी यंत्रसामग्री,त्यांचे सुटे भाग(त्याच्या पुरवठा साखळीसह) व त्यांच्या दुरुस्तीची दुकाने यांच्याबाबत खालीलप्रमाणे आदेश पारित केले आहेत.
1.संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल पंप सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत चालू राहतील.तथापि उस्मानाबाद शहरातील पोलीस वेलफेअर पेट्रोल पंप दररोज 24 तास (24×7)चालू राहील.2.उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पेट्रोल पंप दररोज 24 तास (24×7)चालू राहील.3.संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात (कळंब नगर पालिका क्षेत्रासह) बी-बियाणे व खते या कृषी निविष्ठांची विक्री करणारी दुकाने,आस्थापना,बिज प्रक्रिया केंद्र,त्यानुषंगीक बियाणे पॅकींग, हाताळणी केंद्र,बीज परिक्षण प्रयोगशाळा,कृषी यंत्रसामग्री,त्यांचे सुटे भाग (त्याच्या पुरवठा साखळीसह) व त्यांच्या दुरुस्तीची दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत चालू राहतील.या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा अधीक्षककृषी अधिकारी, सर्व INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय दंडाधिकारी, सर्व INCIDENT COMMANDER तथा तालुका दंडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर पालिका प्रशासनाचे जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.प.), सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सर्व मुख्याधिकारी नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामसेवक, तलाठी इत्यादींची असेल. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील. या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.