जळगांव(प्रतिनिधी)- जगात व देशात कोविड१९ मुळे हाहाकार माजला आहे. संपूर्ण जग ह्या महामारी विषाणू कोरोना व्हायरस शी लढा देत आहे. भारत देशात मार्च महिन्या पासून विषाणू कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले आहे. कोरोना चे सर्वात जास्त पेसेंट महाराष्ट्र मध्ये आढळून आले आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी फार प्रयत्न करीत आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा ह्या युद्धात सहभागी झाले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे जनतेच्या हितासाठी तत्पर आहेत. उद्धवजी ठाकरे साहेब यांचे गौरवास्पद कार्य आहे. ठाकरे साहेब महाराष्ट्रातील जनतेसोबत ठामपणे उभे आहेत. परंतु मुख्यमंत्री यांचे लक्ष आम्ही रिक्षा चालक – मालक यांच्या समस्या कडे वळवीत आहे. साहेब रिक्षा चालक – मालक हे यांचा रिक्षाचा व्यवसाय गेल्या ३ महिन्यापासून लॉक डाऊन मुळे बंद आहे. त्यामुळे सर्व रिक्षा चालक – मालक घरी बसून आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. आज रिक्षा बंद असल्याने घर खर्च भागविण्यासाठी पैसे नाही, अनेक अडचणी चा सामना करावा लागत आहे. रिक्षा चे EMI थकले आहे. तरी माझी आपणांस विनंती आहे की, रिक्षा चालक – मालक यांना शासनाने रुपये प्रत्येकी १०,००० रुपये देऊन अर्थ सहाय्य करावे. जेणे करून रिक्षा चालक – मालक यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही, आम्हाला आशा आहे की, महाराष्ट्र शासन रिक्षा – चालक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडून आश्वासन दिले असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व समता सैनिक दलाचे जळगांव जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी कळविले आहे.