जळगांव(प्रतिनीधी)- मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन मध्ये अत्यावश्यक देणार्या किराणा, मेडिकल, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, पत्रकार, त्यांच्या देखील वाहनांना (स्कुटर, मोटरसायकल) दुरस्ती करता येत नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाही अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्याचा परिणाम म्हणजेच सामान्य लोकांना सेवा देण्यावर होत आहे. एकीकडे सरकार व्यवसाय पण करु देत नाही. दुसरीकडे कामगारांना पुर्ण पगार देण्यास सांगत आहे. सध्याच्या परिस्थितीत स्वतःचा घरखर्च देखील भागवणे कठीण झाले आहे तर कामगारांना पगार कुठून देणार. शासनाकडून जी मदत जाहीर झाली आहे. त्याचा व्यापऱ्यांना काही फायदा झाला नसून उलट ते याकाळात होरपळून निघाले आहे. जवळपास मागील २ महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात वाढून दैनंदिन खर्च वाढवणे देखील कठीण झाले आहे. तरी टू-व्हिलर, आँटो स्पेअर पार्ट यांची दुकाने उघडण्याची परवानगी मिळावी अशी मागणी जळगांव टू-व्हिलर आँटो पार्ट असोसिएशनच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.