Wednesday, July 9, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

घनकचरामुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/05/2020
in राज्य, विशेष
Reading Time: 1 min read

राज्यातील ७६ शहरांना तारांकित मानांकनाचा बहुमान;

तीन तारांकित मानांकनात जळगाव शहराचा तर;एक तारांकित मानांकनात जामनेर, रावेर, वरणगाव शहराचा समावेश

नवी दिल्ली, 20 : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरामुक्त शहरांमध्ये देशातील 141 शहरांना तारांकित मानांकन मिळाले असून एकट्या महाराष्ट्रातील 76 शहरांचा यात समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला पंचतारांकित तर 34 शहरांना तीन आणि 41 शहरांना एक तारांकित शहराचा बहुमान मिळाला आहे. यात तीन तारांकित मानांकनात जळगाव शहराचा तर एक तारांकित मानांकनात जामनेर, रावेर, वरणगाव या जळगाव जिल्ह्यातील शहरांचा समावेश आहे.

केंद्र शासनाच्या नागरी विकास ,गृहनिर्माण व गरीबी उन्मूलन मंत्रालयाकडून देशभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत 2018 पासून कचारामुक्त शहरांना विविध मानकांच्या आधारावरील चाचण्यानंतर तारांकित शहरांचा बहुमान मिळतो . केंद्रीय नागरी विकास ,गृहनिर्माण व गरीबी उन्मूलन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंह पुरी यांनी मंगळवारी वर्ष 2019-20 साठी निवडण्यात आलेल्या कचरामुक्त तारांकित शहरांचा निकाल जाहीर केला. विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कचरामुक्त शहरांच्या तारांकित मानांकनासाठी देशभरातील 4 हजार 372 शहरांपैकी 1435 शहरांनी आवेदने पाठविली होती. यापैकी डिजिटल एमआयएस चाचणीत 698 शहर बाद ठरली. उर्वरित 737 शहरांमध्ये नागरिकांचे मत व मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्यांची एकूण 20 मानकांआधारे चाचणी करून अंतिम 141 शहरांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातील 76 शहरांनी बाजी मारली आहे. देशातील 6 शहरांना पंचतारांकित मानांकन देण्यात आले असून यात नवी मुंबई महानगर पालिकेने बहुमान मिळविला आहे. देशातील 65 शहरांना तीन तारांकित शहरांचा मान मिळाला असून राज्यातील 34 शहरांचा यात समावेश आहे. देशभरातील 70 शहरांना एक तारांकित शहरांचा मान मिळाला असून राज्यातील 41 शहरांचा यात समावेश आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका खालील प्रमाणे.

पंचारांकित मानांकन

नवी मुंबई महानगर पालिका

तीन तारांकित मानांकन

अंबरनाथ,भिवंडी निजामपूर, ब्रह्मपुरी,चंद्रपूर, देवळाळी प्रवरा, धुळे, गड‍हिंगलज, इंदापूर, जळगाव, जालना, जेजुरी, जुन्नर, कागल, क-हाड, खेड, लोणावळा, महाबळेश्वर, मलकापूर, माथेरान, मौदा, मिराभाईंदर, मुर्गुड, नरखेड, पाचगणी, पन्हाळा, राजापूर, रत्नागिरी, आसवड, शिर्डी ,तासगाव, ठाणे, वडगाव, वेंगुर्ला आणि विटा

एक तारांकित मानांकन

अहमदनगर, अकोला, अंजनगाव सुर्जी, आष्टा, बल्लारपूर, बार्शी, भगूर, दौंड, गेवराई, जामनेर, जव्हार, कल्याण-डोंबिवली, खानापूर, खापा, खोपोली, कुळगाव-बदलापूर, कुरुंदवड, महाड, मलकापूर, मंगळवेढे, मुरबाड, नागभीड, नाशिक, पैठण, पनवेल, पेण, फुलंब्री, राजुरा, रामटेक, रावेर, सेलू, संगमनेर, शहादा, शेंदूरजनाघाट, शिरपूर-वरवाडे, उरन, इस्लामपूर, विजापूर, वरणगाव, वसई-विरार आणि वाळूज.

राज्य शासनाने घनकचरा स्ववस्थापनाबाबत आखलेले ठोस धोरण आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरामुक्त शहरांमध्ये देशात आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

स्वच्छ सर्वेक्षणासाठी देण्यात येणाऱ्या एकूण गुणांपैकी 25 टक्के म्हणजे 6000 पैकी 1500 गुण हे केवळ कचरामुक्तीसाठी देण्यात येत असल्याने तारांकित मानकांला विशेष महत्त्व असून यात महाराष्ट्राची सरशी पाहता येत्या काळात स्वच्छ सर्वेक्षण निकालातही महाराष्ट्र अग्रेसर ठरू शकतो.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यातील आजतागायत 941 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
00:00
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications