कळंब, प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात शिराढोण येथे कोरोणाचा रुग्ण सापडला असून या महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला. ही महिला पुणे येथून आली असून ती लातूर येथे उपचार घेण्यासाठी गेल्यावर तिची कोरोना टेस्ट घेण्यात आली त्यात तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्यांच्यावर लातूर येथील वैद्यकीय महविद्यालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांनी दिली. शिराढोन येथे प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू झाल्या आहेत तसेच शिराढोण गाव सील करण्यात आले आहे.