जळगांव(प्रतिनिधी)- कोरोना सारख्या जागतिक संकटामुळे तसेच लॉकडाउनची गंभीर परिस्थिती पाहता अनेक गरीब मजुरांचे काम बंद झाल्याने ते सध्या अत्यंत हलाकीचे दिवस काढत आहेत. त्यामुळे जळगांव उपजिल्हाधिकारी यांच्या परवानगी नुसार कमल केशव प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जळगांव शहरातील बांधकाम मजूर, गरजू व्यक्ती, निराधार, कामगार महिला यांना रोज पुरी भाजी, पुलाव, खिचडी, वाटप करुन आजपर्यंत ११०० लोकांची भूक भागवली. कमल केशव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा भारती केशव म्हस्के(रंधे), अँड. अभिजित रंधे, उपाध्यक्ष प्रकाश रवींद्र सोनवणे यांच्या संकल्पनेतुन सदर उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमासाठी सरिता माळी(कोल्हे), माजी नगरसेविका कमल म्हस्के, निवेदिता ताठे, शोभा हंडोरे, निखिल बिरारी, मृणालिनी, प्रियंका रंधे, शिवनेरी सांस्कृतिक मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभले.