जळगाव दि २१ — डॉ उल्हास पाटील होमीयोपॅथी महाविद्यालय व रूग्णालयातर्फे रोगप्रतिकार शक्ती वाढवणा—या अर्सेनिक अल्बम ३० औषधाचा २५०० व्यक्तींनी लाभ घेतला.अर्सेनिक अल्बम हे औषध आयुष मंत्रालय भारत सरकारच्या होमीओपॅथी शाखेतून संशोधनानंर मान्यताप्राप्त करण्यात आले असून या मंत्रालयाच्या आवाहनानुसार नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी डॉ उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालय व रूग्णालय जळगाव खुर्द येथे बाहयरूग्ण विभाग सूरू करण्यात आला आहे. डॉ उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालय व रूग्णालयाचे प्राचार्य डॉ दिलीप पाटील, प्रकल्प वैदयकिय अधिकारी डॉ अमोल चोपडे, इ तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन करत आहे. सध्या कोरोना परिस्थीतीत मुत्यूची भिती, डोकेदुखी, अस्वस्थता, डोळे घसा जळजळ, घश्यात सूज, आम्लपित्त,पोटदुखी, हदयविकार, लिव्हर व स्टॅलीन वृध्दी व वेदना, तसेच विशेषकरून श्वसनरोग,जिव गुदमरणे, फुफस्सात स्त्रावामूळे खोकला अन्नविषबाधा, इ लक्षणावर हे औषध कार्य करत असून उपयुक्त आहे.कोरोना विषाणूंच्या काही लक्षणांचा नाश या औषधामूळे होत असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत २५०० व्यक्तीनी या औषधाचा लाभ बाहयरूग्ण विभागातून घेतला असून जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे. प्रकल्प सिध्दी साठी ललीत महाजन, किशोर पाटील, जयमाला राणे इ परिश्रम घेत आहेत.