उस्मानाबाद(सत्यमेव जयते न्युज) :- उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरातील आणखी एका महिलेला कोरोना ची बाधा झाल्याचं तपासणीत निष्पन्न झाल आहे.ही महिला चार दिवसांपूर्वी मुंबई येथून उमरगा इथे आलेली होती. मागील दोन दिवसांपासून या महिलेला Quarantine करण्यात आले होते.
काल त्या महिलेचा स्वॅब तपासणीसाठी लातूर येथे पाठवण्यात आला होता तो आज सकारात्मक आला आहे. या महिलेवर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच संपर्कातील काही व्यक्तींना Quarantine केलं असून आणखी काही व्यक्ती या महिलेच्या संपर्कात आलेले आहेत का याचा शोध प्रशासन घेत आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.
आज कळंब तालुक्यातील शिराढोण मधील एका महिलेचा अहवाल सकारात्मक (positive) आला आहे. आता उमरगा येथील हा रुग्ण वाढल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधितांचे ची संख्या आता 14 झाली आहे.