कोरोनाच्या धर्तीवर अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले डाक विभाग आणि कर्मचारी आपल्या सेवेतून तसूभरही मागे सरलेले नाही. कोविड-19 या पार्श्वभूमीवर टपालामार्फत ग्राहकांना त्यांनी मागविलेल्या लहान आजारांपासून किडनी, कँसर अशा विविध त्रासांवरील औषधी तसेच आवश्यक असलेल्या वस्तूंची सेवा अविरतपणे घरपोच देण्यात येत आहे.
हा झाला एक दैनंदिन सेवेचा एक भाग पण या लाॅकडाऊन मध्ये मजुरांचे रोजच होणारे स्थलांतर, आजुबाजूच्या परिसरात राहणाऱ्या गरीबांची कामधंदे ठप्प असल्याने होणारी अन्नासाठी ची धडपड तसेच अत्यावश्यक सेवेत गुंतलेल्या वाहनांच्या चालकांची खानावळी, हाॅटेल्स बंद असल्याने प्रवासात होणारी भुकमोड या सगळ्या गोष्टी विभागाच्या मनात सलतच होत्या, या सर्वांच विचार करुन रेल डाक सेवा विभाग, भुसावळ यांच्यामार्फत वरील सर्वांना फुल नाहीतर फुलाची पाकळी म्हणून वरिष्ठांच्या संमतीने खिचडी वाटपाचे नियोजन करण्यात आले यातुन रोज 120 ते 150 गरजूंची भुक भागविली जात आहे.
हा उपक्रम दिनांक 04.04.2020 पासून आजपर्यंत अखंडीतपणे सुरुच आहे, वाटप करतांना कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून आवश्यक ती काळजी कशी घ्यावी याचे प्रबोधन ही केले जात आहे.
तसेच विभागात भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, धुळे, नाशिक, मनमाड, औरंगाबाद, परभणी आणि नांदेड येथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लाॅकडाऊन ही वाढत आहे म्हणून रोजगार बंद असलेल्या अस्थायी स्वरूपातील रोजंदारीवर कार्यरत असलेल्या व्यक्तींना एका महिनाचा किराणा देखील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वर्गणी करून पुरविलेला आहे.
अशी रेल डाक सेवा, एल विभागाच्या माणुसकीची ही दुसरी सुप्त बाजू या कठिण दिवसांत सर्वांसमोर येत आहे, यासाठी श्री एस आय पठाण, श्री जे पी बाविस्कर, श्री अे पी सुर्यवंशी, श्री पी एस सोनार, श्री ए व्ही केदारी, श्री आर के साळी, श्री सैय्यद जमील, श्री बी एम भस्के आणि श्रीमती आर एल गायकवाड, एफ एन पी ओ आणि एन एफ पी ई च्या सर्व कर्मचार्यांचे तसेच इतर ज्ञात, अज्ञात कर्मचाऱ्यांचे सहकार्य व सदिच्छा लाभत आहे त्या सर्वांचे आभार मानण्यात येत आहे.
सेवेतील दैनंदिन कर्तव्यासोबत मानवी स्वभावाचा दुवा साधणाऱ्या या उपक्रमासाठी श्री व्हि एस जयशंकर पोस्टमास्टर जनरल, औरंगाबाद, श्री बी अरुमुगम, सहा. निर्देशक, औरंगाबाद, श्री बी कृष्णा, अधिक्षक, श्री उल्हास दुसाने, उप अधिक्षक रेल डाक सेवा एल विभाग, भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री वाजिद शेख, प्रमोद पाटील, दशरथ बिऱ्हाडे, रविंद्र गाजरे, भिका कोळी आणि श्री अशफाक तडवी हे परिश्रम घेत आहेत.