भडगांव (प्रतिनिधी) : जगभरात कोरोना विषाणु संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. भडगांव शहरातही कोरोनाचा वाढता पादुर्भाव होतो आहे.आपल्या आरोग्याची रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचविलेले अर्सेनिक् ऐल्बम 30 या औषधी गोळ्या वाटप यशस्विनी सामजिक जनजागृती अभियान प्रमुख़ नगरसेविका योजना पाटील व डी.डी.पाटील सर घरोघरी मास्कसह फिजिकल डिस्टेंट ठेउन मार्गदर्शक सूचना पत्रकाद्वारे करीत आहेत.यशस्वी लढा कोरोनाशी घरात रहा सुरक्षित रहा आरोग्याची काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करा. भडगांव शहर आत्मविश्वासाने कोरोनामुक्त करुया असा संकल्प करण्याचे आवाहनही नगरसेविका योजना पाटील करीत आहेत.